लालूंच्या कुटुंबातील कलह निवडणुकीच्या रिंगणात, सारणमध्ये नणंद-भावजयीमध्ये लढतीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:45 AM2024-04-03T10:45:54+5:302024-04-03T10:46:11+5:30

Bihar Lok Sabha ELection 2024: लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह लाेकसभेच्या रिंगणातही पाेहाेचला आहे. बिहारमधील सारण मतदारसंघातून मुलगी राेहिणी आचार्य यांना लालूंनी उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यावरुन त्यांची माेठी सून ऐश्वर्या या नाराज असून त्या नणंदेलाच आव्हान  देऊ शकतात.

Bihar Lok Sabha ELection 2024: Lalu's family feud in the election arena, possibility of Nanand-Bhavjay fight in Saran | लालूंच्या कुटुंबातील कलह निवडणुकीच्या रिंगणात, सारणमध्ये नणंद-भावजयीमध्ये लढतीची शक्यता

लालूंच्या कुटुंबातील कलह निवडणुकीच्या रिंगणात, सारणमध्ये नणंद-भावजयीमध्ये लढतीची शक्यता

- एस. पी. सिन्हा
पाटणा : लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील कलह लाेकसभेच्या रिंगणातही पाेहाेचला आहे. बिहारमधील सारण मतदारसंघातून मुलगी राेहिणी आचार्य यांना लालूंनी उमेदवारी जाहीर केली. मात्र, त्यावरुन त्यांची माेठी सून ऐश्वर्या या नाराज असून त्या नणंदेलाच आव्हान  देऊ शकतात.

काैटुंबिक न्यायासाठी ऐश्वर्या राय यांनी न्यायालयात धाव घेतली हाेती. आता त्या राजकीय न्याय मिळविण्यासाठी लालूंच्या कुटुंबीयांसमाेर आव्हान निर्माण करु शकतात. बिहारचे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांनीही तसे संकेत दिले आहेत. लालूंची मुलगी जिथून निवडणूक लढविणार, तेथे त्यांची सूनही प्रतीक्षेत असेल, असे सिन्हा म्हणाले हाेते. 

राजीव रूडीही रिंगणात
- सारणमधून भाजपचे राजीव प्रताप रूडी रिंगणात आहेत.
- त्यांच्यासमाेर १९९६पासून कायम लालूंच्या कुटुंबातील व्यक्तीच उमेदवार हाेती.
- यावेळीही तसेच चित्र असून नणंद-भावजय एकमेकांविराेधात उभ्या राहिल्यास सारणमध्ये त्रिकाेणी लढत पाहायला मिळेल.
- सारणमधून राेहिणी यांनी प्रचाराला मंगळवारपासून सुरूवात केली आहे.

Web Title: Bihar Lok Sabha ELection 2024: Lalu's family feud in the election arena, possibility of Nanand-Bhavjay fight in Saran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.