Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:11 PM2019-05-23T14:11:41+5:302019-05-23T14:13:08+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बेगुसराय मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे.

Begusarai Lok Sabha Election Result 2019: BJP's Giriraj Singh lead In Begusarai | Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता

Begusarai Lok Sabha Election Result 2019: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बेगुसरायमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता

Next

पाटणा  - लोकसभा निवडणुकीचे कल आता बऱ्यापैकी स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यातही  काही मतदारसंघांमध्ये धक्कादायक कल समोर आले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहारमधील बेगुसराय मतदारसंघात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता दिसत आहे. येथे विद्यार्थी नेते कन्हैया कुमार मोठ्या फरकाने पिछाडीवर पडले आहेत. तर भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी मोठी आघाडी घेतली आहे. 

बिहारमधील डाव्या पक्षांचा गड मानल्या जाणाऱ्या बेगुसराय मतदारसंघातून कन्हैया कुमार यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, भाजपाने कन्हैया कुमार यांच्याविरोधात प्रखर हिंदुत्ववादी चेहरा असलेल्या गिरिराज सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेस-राजद महाआघाडीने तन्वीर हसन यांना उमेदवारी दिल्याने येथील निवडणूक त्रिशंकू झाली होती. 

दरम्यान, आज मतमोजणीला सुरुवात झाल्यावर भाजपाच्या गिरिराज सिंह यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार गिरिराज सिंह यांना 4 लाख 14 हजार 537 मते मिळाली आहेत, तर कन्हैया कुमार यांना एक लाख 75 हजार 379 मते मिळाली आहेत, तर महाआघाडीचे तन्वीर हसन यांना 1 लाख 18 हजार 350 मते मिळाली आहेत. 

Web Title: Begusarai Lok Sabha Election Result 2019: BJP's Giriraj Singh lead In Begusarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.