56 children die in Bihar due to 'spiny fever' | ‘चमकी बुखार’मुळे बिहारमध्ये ५६ मुलांचा मृत्यू
‘चमकी बुखार’मुळे बिहारमध्ये ५६ मुलांचा मृत्यू

पाटणा : ‘चमकी बुखार’ या नावाच्या तापामुळे बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात सोमवारपर्यंत २५ मुलांचा मृत्यू झाला. उत्तर बिहारमध्ये या आजाराने ५६ मुलांचा बळी घेतला.

या तापामुळे आजारी असलेली १०० मुले मुजफ्फरपूरच्या श्रीकृष्ण मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत. या तापाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासन तिसरा कक्ष उघडण्याच्या प्रयत्नात आहे. या तापामुळे पीडित असलेली मुले ४ ते १५ वयोगटातील आहे. या तापाचा प्रकोप उत्तर बिहारमधील सीतामढी, शिवहर, मोतिहारी व वैशाली जिल्ह्यांत अधिक आहे. एईएस (एक्टूड इंसेफेलाइटिस सिंड्रोम) आणि जेई (जपानी इंसेफलाइटिस) असे नाव असलेल्या तापास बिहार मध्ये ‘चमकी बुखार’ म्हणून ओळखतात. (वृत्तसंस्था)
 


Web Title: 56 children die in Bihar due to 'spiny fever'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.