5 killed, 11 seriously injured in bus accident of devria | प्रवासी बसला भीषण अपघात, 5 ठार 11 गंभीर जखमी

प्रवासी बसला भीषण अपघात, 5 ठार 11 गंभीर जखमी

कुशीनगर आणि देवरिया जिल्ह्यातील सीमारेषवरील भुजौली गावानजीक रविवारी रात्री एका प्रवासी बसला अपघात झाला. या बसमधील 81 प्रवाशांपैकी महराजगंज जिल्ह्यातील 5 जणांचा मृत्यू झाला असून 11 गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, जखमींना गोरखपूर येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सीतामढी येथून जयपूरकडे ही बस जात होती. मात्र, रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हरचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अमित कुमार यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ मदत मिळवून दिली. बसमधील प्रवाशांना टोल प्लाझाच्या सुविधा केंद्रावर शिफ्ट करण्यात आले. त्याठिकाणीच त्यांच्या जेवणाचाही सोय करण्यात आली होती. सोमवारी सकाळी या प्रवाशांना त्यांच्या मोक्याच्या ठिकाणी पाठविण्यात आले. दरम्यान, या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर, 15 किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. 
 

Web Title: 5 killed, 11 seriously injured in bus accident of devria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.