"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 06:36 IST2026-01-11T06:34:44+5:302026-01-11T06:36:39+5:30
लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

"बीस साल बाद एकत्र आलेले विकासात खोडा घालत आहेत"; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
नाशिकः आम्ही विकासाच्या माध्यमातून प्रगती करणारे असून स्थगिती देणारे नसल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे विरोधकांना लगावला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री येथील अनंत कान्हेरे मैदानावर आयोजित शिंदेसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार) युतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
ज्या उमेदवारांच्या पाठिशी महिला, त्यांचा मतपेटीत नंबर पहिला, असे सांगत लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. माता-भगिनींच्या विकासाचा आपला अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ यांच्या कल्याणासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपण पूर्णपणे विकासकेंद्री राजकारण करत आहोत. मात्र, सर्वसामान्य जनतेसाठी नव्हे तर स्वतःच्या अस्तित्वासाठी बीस साल बाद एकत्र आलेले काही जण केवळ विकास प्रक्रियेत खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत- एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री