हरिद्वार येथील कुंभमेळ्यात नाशिकच्या उत्तम स्वामी यांचा पट्टाभिषेक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 00:21 IST2021-04-12T23:28:05+5:302021-04-13T00:21:52+5:30

नाशिक : ध्यानयोगी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले उत्तम स्वामीजी पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर बनले आहेत. सर्व आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीत उत्तम स्वामीजी यांचा हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सनातनधर्म पद्धतीने पट्टाभिषेक करण्यात आला.

Pattabhishek ceremony of Uttam Swami of Nashik at Kumbh Mela at Haridwar | हरिद्वार येथील कुंभमेळ्यात नाशिकच्या उत्तम स्वामी यांचा पट्टाभिषेक सोहळा

हरिद्वार येथे आचार्य महामंडलेश्वर ईश्वरानंद यांचा पट्टाभिषेक करताना साधू संत.

ठळक मुद्देपंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर : पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

नाशिक : ध्यानयोगी म्हणून भारतभर प्रसिद्ध असलेले उत्तम स्वामीजी पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर बनले आहेत. सर्व आखाड्यांच्या प्रमुख महंतांच्या उपस्थितीत उत्तम स्वामीजी यांचा हरिद्वारच्या कुंभमेळ्यात सनातनधर्म पद्धतीने पट्टाभिषेक करण्यात आला.
हरिद्वार येथे सध्या कुंभमेळा सुरू आहे. सर्व प्रमुख १३ आखाड्यांचे भारतभरातील प्रमुख आचार्य महामंडलेश्वर, श्री महंत व महंत हरिद्वार येथे जमले आहेत. आतापर्यंत कोणत्याही आखाड्याशी संबंधित नसलेले मूळचे महाराष्ट्रातील, पण सध्या राजस्थानमधील बासवाडा येथे वास्तव्य असलेले ध्यानयोगी उत्तम स्वामीजी यांचा भारतभर व विदेशातही भक्त परिवार आहे.

बासवाडासह हरिद्वार, उज्जैन, सलकनपूर, लोहगाव, मंदसौर येथे त्यांचे आश्रम आहेत. त्या माध्यमातून अनाथांसाठी शाळा, आरोग्यसेवा, अन्नदान आदी अनेक सेवाकार्य चालवले जातात.
हरिद्वार येथील पट्टाभिषेक सोहळ्यास पंचअग्नी आखाड्याचे महामंडलेश्वर रामकृष्णानंद, सभापती महंत मुक्तानंद ब्रम्हचारी महाराज, महामंत्री महंत सोमेश्वरानंद महाराज, आचार्य महामंडलेश्वर ब्रह्मर्षी रामकृष्णानंद, सचिव संपूर्णानंद महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, महामंडलेश्वर मॉ कनकेश्वरी देवी, द्वारिका सनातनी सेवामंडलाचे केशवानंद महाराज, रामजन्मभूमी न्यासाचे सचिव चंपकराय, मुक्तानंद यांच्यासह १३ आखाड्यांचे प्रमुख साधुमहंत यांच्यासह भक्तपरिवार उपस्थित होता. रामबाबा यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

महामंडलेश्वर ईश्वरानंद
ध्यानयोगी स्वामी उत्तम स्वामीजी यांना पंचअग्नी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर झाल्याने त्यांना आता महामंडलेश्वर ईश्वरानंद म्हणून ओळखले जाणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र गुरुभक्त मंडळाचे अध्यक्ष संजय नागरे यांनी दिली.
 

Web Title: Pattabhishek ceremony of Uttam Swami of Nashik at Kumbh Mela at Haridwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.