NCP to supply logistics to Congress in Igatpur | इगतपुरीत कॉँग्रेसला रसद पुरविणार राष्टÑवादी
इगतपुरीत कॉँग्रेसला रसद पुरविणार राष्टÑवादी

नाशिक : इगतपुरी विधानसभा मतदार संघातील कॉँग्रेसचे आमदार निर्मला गावित यांनी शिवसेना प्रवेश केल्यामुळे उमेदवाराच्या शोधात असलेल्या कॉँग्रेसला येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑवादीने उमेदवाराची रसद पुरविण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी कॉँग्रेसनेही जिल्हा परिषदेच्या एका माजी पदाधिकाऱ्याला गळ टाकून पक्ष प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे राष्टÑवादीच्या या प्रयत्नांना गावित यांच्या विरोधकांनीही बळ देण्याचे ठरविले आहे.
निर्मला गावित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. वरकरणी मतदार- संघातील विकासकामे करण्यासाठी आपण सेनेत प्रवेश करीत असल्याचे गावित यांनी म्हटले असले तरी, मतदारसंघात त्यांच्या विरोधातील वातावरण पाहता, त्यांनी पक्ष बदलून सेनेकडून उमेदवारी करण्यासाठीच पक्षांतर केल्याचे बोलले जात आहे; मात्र गावित यांच्या सेना प्रवेशाला स्थानिक शिवसैनिकांनी विरोध दर्शविला त्याचबरोबर सेनेच्या इच्छुक उमेदवारांकडूनदेखील मातोश्रीवर धाव घेऊन गावित यांना उमेदवारी न देण्याची मागणी केली. इगतपुरी मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांनी गावित यांच्या विरोधात एकत्र येत निवडणुकीत त्यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय वातावरण गरम झाले असताना कॉँग्रेसकडे मात्र गावित यांना टक्कर देण्यायोग्य सक्षम उमेदवाराची वानवा असल्याची बाब आघाडीच्या नेत्यांच्या निदर्शनास आली आहे.
जागा वाटपात इगतपुरीची जागा कॉँग्रेसच्या वाट्याला असून, यंदाही ती कॉँग्रेसला सोडण्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यासाठी उमेदवाराचा शोध सुरू असताना नाशिकच्या दौºयावर आलेले राष्टÑवादीचे शरद पवार यांनी इगतपुरी मतदार संघाची राजकीय परिस्थिती जाणून घेताना कॉँग्रेसला गावीत यांच्या विरोधात रसद पुरविण्याचे संकेत दिले.

जागा वाटपात इगतपुरीची जागा कॉँग्रेसच्या वाट्याला असून, यंदाही ती कॉँग्रेसला सोडण्याचे जवळ जवळ निश्चित झाले आहे. त्यासाठी उमेदवाराचा शोध सुरू असताना नाशिकच्या दौºयावर आलेले राष्टÑवादीचे शरद पवार यांनी इगतपुरी मतदार संघाची राजकीय परिस्थिती जाणून घेताना कॉँग्रेसला गावीत यांच्या विरोधात रसद पुरविण्याचे संकेत दिले. त्यानुसार राष्टÑवादीकडून यंदा देवळाली मतदार संघातून निवडणुकीची तयारी करणाºया जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाºयालाच कॉँग्रेसमध्येच पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदाधिकाºयाला विधानसभा निवडणुकीचा पुर्वानुभव असून, कॉँग्रेसने देखील त्याला पक्षात घेण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे राष्टÑवादीच्या या पदाधिकाºयाला इगतपुरी विधानसभा मतदार संघातील गावीत यांच्या सर्वपक्षीय विरोधकांनी देखील सहमती दर्शविली असून, त्यामुळे इगतपुरीच्या तप्त राजकीय वातावरणात भर पडली आहे.


Web Title: NCP to supply logistics to Congress in Igatpur
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.