Nashik Municipal Election Result 2026 :अनेक नगरसेवकांचे फोन स्विच ऑफ, नवस फेडण्यासाठी देवदर्शन; महापौर दावेदार नाशकातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 12:46 IST2026-01-19T12:45:38+5:302026-01-19T12:46:34+5:30

Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवकांचे फोन स्वीच्ड ऑफ आहेत.

Nashik Municipal Election Result 2026 Many corporators' phones switched off, Devdarshan to fulfill vows | Nashik Municipal Election Result 2026 :अनेक नगरसेवकांचे फोन स्विच ऑफ, नवस फेडण्यासाठी देवदर्शन; महापौर दावेदार नाशकातच

Nashik Municipal Election Result 2026 :अनेक नगरसेवकांचे फोन स्विच ऑफ, नवस फेडण्यासाठी देवदर्शन; महापौर दावेदार नाशकातच

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवकांचे फोन स्वीच्ड ऑफ आहेत. अभिनंदनाचा वर्षाव करणारे परिचितांचे फोन वेगळेच, परंतु निवडणूक काळात झालेल्या खर्चाचे बिल घेण्यासाठी अनेकांनी तगादा लावल्याने या नगरसेवकांवर फोन बंद करण्याची वेळ आली आहे.

नाशिक मनपात अनेक नगरसेवक नवीन आहेत. निवडणूक कालावधीत प्रचार, मंडप टाकणे यापासून सोशल मीडिया, कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजन अशा प्रकारचा खर्च करावाच लागतो. निवडणुका संपल्यानंतर अनेकदा पराभूत उमेदवार निवडणुकीत खर्च खूप झाला म्हणून अनेक व्यावसायिकांना रक्कम लवकर देत नाहीत. दुसरीकडे अनेक जण निवडून आल्यानंतरदेखील भूमिका बदलून नंतर देतो, असे सांगत असतात. आता तर निवडणुकीचा निकाला लागून अवघे दोन दिवस झाले असल्याने अभिनंदनाचे फोन येत असले तरी बहुतांश घेणेकऱ्यांचे फोन येत असल्याने नगरसेवकांचे फोन स्विच ऑफ येता आहेत. त्यामुळे घेणेकरी हैराण झाले आहेत.

निवडणुकीनंतर आता सत्कार सोहळे सुरू असले तरी अशावेळी सहजपणे भेटणारे अनेक जण मात्र घेणेकऱ्यांना भेटत नसल्याची तक्रार आहे. दुसरीकडे काही जण निवडणुकीत प्रचंड थकल्याने सहलीसाठी गेले आहेत, तर काही जणा निवडणुकीतील नवस फेडण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे.

महापौर दावेदार नाशकातच

नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या आरक्षणाची अद्याप सोडत निघालेली नाही. मात्र, त्यावर अनेकांचे लक्ष आहे. विशेषतः भाजपतील वरिष्ठ नगरसेवक या पदावर दावा करू शकत असल्याने ते अद्याप नाशिकमध्येच आहेत.

Web Title : नाशिक: नगरसेवकों के फोन बंद, मंदिर दर्शन, महापौर पद के दावेदार शहर में

Web Summary : नाशिक में नए नगरसेवक बिल संग्राहकों से बचने के लिए फोन बंद कर रहे हैं। कुछ यात्रा पर, कुछ मन्नतें पूरी कर रहे हैं। महापौर पद के उम्मीदवार आरक्षण की घोषणा का इंतजार कर रहे हैं।

Web Title : Nashik Corporators' Phones Off, Temple Visits, Mayor Aspirants in City

Web Summary : Newly elected Nashik corporators switch off phones to avoid bill collectors. Some take trips, others fulfill vows. Mayor aspirants stay put, awaiting reservation announcement.