Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:49 IST2026-01-02T12:49:08+5:302026-01-02T12:49:34+5:30
Nashik Mahanagar Palika Election 2026: संतप्त कार्यकर्त्यांनी केदार व इतर पदाधिकाऱ्यांना गाजर भेट देत आपली खदखद व्यक्त केली.

Nashik Municipal Election 2026: भाजप शहराध्यक्षांना नाराजीची गाजरे! सुनील केदार यांना घेराव, पक्ष कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न
नाशिक रोड : कोणता सर्व्हे, कोणी केला, पक्षात कधी आले, पक्षासाठी काय काम केले, तिकिटे विकली असे एक ना अनेक प्रश्न व जाब विचारत नववर्षाच्या पहिल्या दिवशी नाराज इच्छुक व कार्यकर्त्यांची व्यथा ऐकण्यासाठी आलेल्या शहराध्यक्ष सुनील केदार यांनाच संतप्त पदाधिकारी, कार्यकर्ते त इच्छुकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
केदार व इतर पदाधिकाऱ्यांना कार्यालयाचे शटर लावून आत घेण्यात आले. मात्र, कार्यकार्त्यांनी त्यांना कोंढण्याचा प्रयत्न केला, यावेळी केदार यांनी नाराज इच्छुक व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत प्रदेश पातळीवर हे सर्व सांगण्याचे आश्वासन दिले. त्यानंतरही संतप्त कार्यकर्त्यांनी केदार व इतर पदाधिकाऱ्यांना गाजर भेट देत आपली खदखद व्यक्त केली. मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांनी इच्छुक असलेले उमेदवार, कार्यकर्ते यांना फोन करून जेलरोड कोठारी कन्या शाळेशेजारील भाजपा नाशिकरोड मंडलाच्या कार्यालयात आपलं म्हणणे मांडण्यासाठी फोन करून बोलवले होते.
शहराध्यक्ष सुनील केदार हे दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास कार्यालयात येत असताना धिक्कार असो, धिक्कार असो अशा घोषणा देण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली. कार्यकर्ते अनेक प्रश्न त जाब विचारत व्यथा ऐकण्यास आलेल्या केदार यांना खडेबोल सुनावले. दीड एक तासानंतर केदार है पदाधिकाऱ्यांसह कार्यालयाबाहेर आले असता त्यांना संतप्त इच्छुक व कार्यकर्त्यांनी गाजर भेट देत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी सचिन होडगे अंबादास पगारे, हर्षदा पवार, गीता उगले, सीमा डावखर, मंदा फड़, मीनाश्री शिरोळे, भावना नारद, राजश्री जाधव, रिपाइंचे माजी नगरसेवक संजय भालेराव, राकेश जाधव, विजय लोखंडे, महिंद्र अहिरे, योगेश कपिले, ज्योती चव्हाणके, ऋषिकेश नारद, निवृत्ती अरिंगळे, शरद जगताप, नवनाथ ढंगे, प्रीतम संघवी, कल्पेश जोशी, संदीप शिरोळे, कैलास आढाव, हेमंत नारद, तुषार वाघमारे, रामदास गांगुर्डे, किरण पगारे, गौरव विसपुते, जिकास पगारे, राम कदम, सुरेश घुगे, निजय लोखंडे, विलास मुळाणे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नाराज इच्छुक व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिकरोड येथे घडलेला प्रकार नाराज कार्यकत्यांचा उद्रेक होता. याची माहिती वरिष्ठांपर्यंत कळवण्यात आली आहे. भाजपमध्ये शिस्तीचे पालन करणे गरजेचे आहे. बाहेरून आलेल्यांना या शिस्तीची पुरैशी कल्पना नसल्याने असे प्रकार होत असून दोषींचर निश्चितच शिस्तभंगाची कारवाई होईल. मुथाकर बडगुजर यांना पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी त्याचे पालन केले नाही तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.
- सुनील केदार, शहराध्यक्ष, भाजप