नाशिकमध्ये शिंदेंचं बळ वाढलं, माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिंदेसेनेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 16:33 IST2026-01-06T16:32:31+5:302026-01-06T16:33:45+5:30
Nashik Municipal Corporation Election: सध्या सुरू असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. दरम्यान, आज नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

नाशिकमध्ये शिंदेंचं बळ वाढलं, माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिंदेसेनेत
सध्या सुरू असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिंदेसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. दरम्यान, आज नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये शिंदेसेनेला आणखी बळ मिळालं आहे.
नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप निवासस्थानी येऊन शिंदेसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. दत्तात्रय पाटील महापौर असताना नाशिकचा कुंभमेळा पार पडला होता. त्यांचा कुंभमेळा नियोजनातील अनुभव पक्षासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंत गोडसे आणि शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
तर अशोक मुर्तडक हे काही महिन्यांपूर्वी उद्धवसेनेत होते. पुढे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. तसेच नाशिक महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ६ मधून त्यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर प्रभाग क्रमांक ५ ड मधून ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. त्यानंतर शिंदेसेनेने त्यांना पाठिंबा दिला होता. आता अशोक मुर्तडक यांनी थेट शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.