यंदाच्या मनपा निवडणुकीत ३८ टक्के युवा उमेदवार; माजी नगरसेवकांची दुसरी पिढीही मैदानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:50 IST2026-01-12T15:50:10+5:302026-01-12T15:50:57+5:30
महापालिका निवडणुकीत शहरातील ३१ प्रभागांमध्ये १२२ जागांसाठी एकूण १३९० उमेदवार निवड निवडणूक रिंगणात आहेत, त्यापैकी ५३१ उमेदवार २१ ते ३० वयोगटातील आहेत.

यंदाच्या मनपा निवडणुकीत ३८ टक्के युवा उमेदवार; माजी नगरसेवकांची दुसरी पिढीही मैदानात
नाशिक : महापालिका निवडणुकीत शहरातील ३१ प्रभागांमध्ये १२२ जागांसाठी एकूण १३९० उमेदवार निवड निवडणूक रिंगणात आहेत, त्यापैकी ५३१ उमेदवार २१ ते ३० वयोगटातील आहेत. म्हणजेच, एकूण उमेदवारांपैकी सुमारे ३८ टक्के तरुण उमेदवार आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ पक्षीय लढत न राहता नव्या पिढीच्या राजकीय प्रवेशाची साक्ष देणारी ठरली आहे.
यंदाच्या महापालिका निवडणुकीत सर्वाधिक युवा उमेदवारांची निवडणूक ठरणार आहे. अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांच्या तरुण मुलांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात वारसा आणि नवचैतन्य यांचा संघर्ष मिळेल. पाहायला अनुभवाचा असलेल्या घराणेशाहीच्या आधार राजकारणाचे आणि थेट, मुद्देसूद आणि सोशल मीडियावर आधारित प्रचाराचे मुद्दे हे यंदाच्या महापालिका निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
पक्षीय पातळीवर तरुणांचे प्रमाण
शिंदेसेना : ८० उमेदवारांपैकी ३० तरुण उमेदवार : सुमारे ३७.५ टक्के
भाजप : ११६ उमेदवार व २ पुरस्कृत असे एकूण ११८ उमेदवार; यामध्ये ३२ तरुण उमेदवार : सुमारे २७टक्के
विशेष म्हणजे यामध्ये भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह माजी नगरसेवकांच्या तरुण मुलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना: ८२ उमेदवारांपैकी २७ तरुण : ३२.९ टक्के
मनसे: २९ उमेदवारांपैकी १६ तरुण : तब्बल ५५ टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : २० उमेदवारांपैकी ८ तरुण : ४० टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ३० उमेदवारांपैकी १८ तरुण : ६० टक्के
वंचित बहुजन आघाडी : ५५ उमेदवारांपैकी ३० हून अधिक तरुण : ५५ टक्क्यांपेक्षा जास्त
आम आदमी पक्ष: २८ उमेदवारांपैकी २१ तरुण : तब्बल ७५ टक्के, सर्व पक्षांमध्ये सर्वाधिक
माकप : ९ उमेदवार, भाकप : १ उमेदवार; प्रभाग क्रमांक १३ मध्ये उमेदवार मैदानात उतरल्याने लक्ष वेधले गेले आहे.
अपक्षांमध्येही तरुणांची आघाडी
नाशिकमध्ये यंदा २४० अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यापैकी ४१० उमेदवार तरुण आहेत. म्हणजेच अपक्ष उमेदवारांमध्येही सुमारे ४४ टक्के तरुणांचे प्रतिनिधित्व आहे. ही आकडेवारी तरुणांचा राजकारणाकडे वाढता कल दर्शवत आहे.
दुसरी पिढी राजकारणात सक्रिय
अनेक प्रभागांमध्ये माजी नगरसेवकांच्या तरुण मुलांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात अनुभव आणि नव्या पिढीतील उत्साह यांची लढत पाहायला मिळणार आहे.