Nashik: नाशिकच्या उमेदवारीत ट्विस्ट! शांतिगिरी महाराजांना हवी महायुतीची उमेदवारी

By संजय पाठक | Published: April 28, 2024 08:36 AM2024-04-28T08:36:05+5:302024-04-28T08:37:28+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेचा घोळ सुरू असताना आता आणखी एक नवीन ट्विस्ट पुढे आला आहे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारे बाबाजी भक्त परिवाराचे परमपूज्य शांतिगिरी महाराज यांनी महायुतीकडून उमेदवारी मागितली आहे.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Twist in the candidature of Nashik! Shantigiri Maharaj wants Mahayuti's candidature | Nashik: नाशिकच्या उमेदवारीत ट्विस्ट! शांतिगिरी महाराजांना हवी महायुतीची उमेदवारी

Nashik: नाशिकच्या उमेदवारीत ट्विस्ट! शांतिगिरी महाराजांना हवी महायुतीची उमेदवारी

 - संजय पाठक
नाशिक- लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेचा घोळ सुरू असताना आता आणखी एक नवीन ट्विस्ट पुढे आला आहे अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणारे बाबाजी भक्त परिवाराचे परमपूज्य शांतिगिरी महाराज यांनी महायुतीकडून उमेदवारी मागितली आहे. मात्र त्यांच्या मनधरणीच्या प्रयत्न सुरू आहेत.

शांतिगिरी महाराज यांची नाशिकमध्ये रॅली सुरू असतानाच नाशिक मधील महायुतीचे समन्वयक आणि शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी त्यांची सिडको येथे भेट घेतली आणि त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे महायुतीची मत विभागणी होईल आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल असे मत बोरस्ते यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला निवडून द्यायचे असल्यामुळे शांतिगिरी महाराज यांनी महायुतीला आशीर्वाद द्यावा अशी विनंती अजय बोरस्ते यांनी केली. बाबाजी भक्त परिवाराचे सात मतदारसंघात प्रभाव क्षेत्र असून त्यामुळे महायुतीला समर्थन द्यावे अशी विनंती बोरस्ते  यांनी मात्र शांतिगिरी महाराज यांनी महायुतीची उमेदवारी आपल्याला मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली असे बोरस्ते यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पहिल्याच दिवशी शांतिगिरी महाराज यांनी अनुराधा मुहूर्तावर अर्ज दाखल केला आहे. उद्या म्हणजे सोमवारी भक्त परिवाराचे शक्तिप्रदर्शन करत ते पुन्हा अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान नाशिक लोकसभा मतदार संघात अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Twist in the candidature of Nashik! Shantigiri Maharaj wants Mahayuti's candidature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.