सरोज अहिरे यांना देवळालीतून उमेदवारी; अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2024 10:26 IST2024-10-23T10:26:22+5:302024-10-23T10:26:58+5:30

सरोज अहिरे यांना एबी फॉर्म मिळाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

maharashtra assembly election 2024 saroj ahire nominated from devlali distribution of ab form by ncp dcm ajit pawar | सरोज अहिरे यांना देवळालीतून उमेदवारी; अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप

सरोज अहिरे यांना देवळालीतून उमेदवारी; अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्मचे वाटप

नाशिकरोड: देवळाली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना मंगळवारी (दि. २२) पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला. यावेळी देवळाली मतदारसंघातील पदाधिकारी आमदार अहिरे यांच्यासह उपस्थित होते. संभाव्य यादीमध्ये अहिरे यांचे नाव असल्याने त्याबाबतची औपचारिकता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत एबी फॉर्म देऊन पूर्ण करण्यात आली.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यादी जाहीर करण्याऐवजी विद्यमान उमेदवारांना थेट एबी फॉर्म देत आहेत. सोमवारी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एबी फॉर्म देण्यात आले होते. त्याच्य दुसऱ्याच दिवशी मंगळवार देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवगिरी बंगल्यावर एबी फॉर्म दिला. 

अहिरे यांना उमेदवारी अर्ज प्रदान करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी खासदार देवीदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, निवृत्ती अरिंगळे, दिलीप थेटे, प्रेरणा बलकवडे, सोमनाथ बोराडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्या पार्श्वभूमीवर अहिरे यांना एबी फॉर्म मिळाल्याचे समजताच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
 

 

Web Title: maharashtra assembly election 2024 saroj ahire nominated from devlali distribution of ab form by ncp dcm ajit pawar