लोकसभा निवडणुकीत महिलांचा उदंड उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:50 AM2019-04-30T01:50:19+5:302019-04-30T01:50:35+5:30

लोकशाहीचा उत्सव त्यात प्रथमच मतदान करण्याची संधी यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईचा उदंड उत्साह अनुभवाला आला

 Lots of women excited in Lok Sabha elections | लोकसभा निवडणुकीत महिलांचा उदंड उत्साह

लोकसभा निवडणुकीत महिलांचा उदंड उत्साह

Next

नाशिक : लोकशाहीचा उत्सव त्यात प्रथमच मतदान करण्याची संधी यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तरुणाईचा उदंड उत्साह अनुभवाला आला आणि मतदान केल्यानंतर तो त्यांच्या चेहेऱ्यावर झळकला. दुसरीकडे निर्णायक ठरू शकणाºया स्त्री शक्तीनेदेखील उन्हाची तमा न बाळगता मतदान केंद्रांवर रांगा लागून मतदान केले. नाशिकचा टक्का वाढण्याचे श्रेय त्यांना दिले जात आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२९) मोठ्या उत्साहात मतदान झाले. यात सर्वाधिक चर्चेत होती ती तरुणाई आणि महिलांचे मतदान.
लोकसभा निवडणुकीत यंदा फर्स्ट टाइम व्होटर तरुणाई आणि महिला या दोन घटकांचे मतदान सर्वांत महत्त्वाचे होते. नवी पिढी ही सर्वच बाबतीत अत्यंत सजग असल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनीदेखील प्रयत्न केले. यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघात आठ लाख ९३ हजार ७७ महिला मतदार होत्या. एकूण मतदार संख्येच्या सुमारे चाळीस ते पंचेचाळीस टक्के मतदान असल्याने ही स्त्री शक्तीदेखील महत्त्वाची मानली जाते त्यामुळे यंंदा हे मतदान महत्त्वाचे होते.
सोमवारी सकाळपासूनच शहरातील विविध केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मतदानाला लवकर संधी मिळावी यासाठी सकाळपासून रांगा असल्या तरी त्यात तरुणाईचा उत्साह प्रचंड होतात. अनेक युवक-युवती कुटुंबाखेरीज एकत्रित मतदानासाठी आले होते आणि त्यानंतर मतदानानंतर त्यांनी सेल्फीदेखील काढले. केवळ युवक-युवतीच नव्हे तर अनेक ठिकाणी महिलांच्या एकत्रित ग्रुपने एकत्रित मतदान करण्याबरोबरच भेटीचा आनंद लुटला. सर्व सख्या त्यासाठी खास एकत्र आल्या होत्या. शहरातील जुन्या नाशिक भागातदेखील अल्पसंख्याक समाजाच्या महिला सकाळीच बाहेर पडल्या होत्या. सायंकाळीही महिलांची मोठी गर्दी होती.
महिलांसाठी स्वतंत्र रांगा नाही तरीही...
निवडणूक आयोगाने यंदा महिलांसाठी स्वतंत्र रांगा करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र महिलांच्या सखी केंद्राशिवाय अशी व्यवस्था नव्हती. मात्र तरीही महिलांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. दुपारनंतर बहुसंख्य मतदानकेंद्रांवर महिलांची मतदानासाठी रांग दिसून आली. महिलांमधील मतदानाचा हा उत्साह सायंकाळपर्यंत कायम होता. बी.डी. भालेकर केंद्रावर उशिरांपर्यंत महिलांची गर्दी होती.

Web Title:  Lots of women excited in Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.