येवला आगारात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:29 IST2021-03-10T22:26:39+5:302021-03-11T01:29:34+5:30

येवला : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Honoring female staff at Yeola Depot | येवला आगारात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

येवला आगारात महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान

ठळक मुद्देकोरोना संकटकळातही कर्मचाऱ्यांनी जनसेवेसाठी आपले कर्तव्य बजावले.

येवला : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
                               आगारातील महिला कर्मचाऱ्यांचा प्रशासन व कामगार सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला, तसेच वाहतूक नियंत्रक अप्पासाहेब जाधव यांनी महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तू दिल्या. परिवहन महामंडळातील कर्मचारीही खऱ्या अर्थाने कोविड योद्धे आहेत. कोरोना संकटकळातही कर्मचाऱ्यांनी जनसेवेसाठी आपले कर्तव्य बजावले. याचा अभिमान असल्याचे आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी सांगितले.                                                                                                वाहतूक नियंत्रक विकास वाहुळ यांनी महिला हक्क व अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. सत्कारार्थींच्या वतीने वाहक सविता काळे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रशसनाचे आभार मानले. कार्यक्रमास सहायक कार्यशाळा अधीक्षक किशोर हाडपे, वरिष्ठ लिपिक राजू मुरडनर, नारायण भागवत, रवि जगताप, सचिन देशमुख, सोनू गंडाळ, दिगंबर आगवण, सचिन नागरे, संदीप मोरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Honoring female staff at Yeola Depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.