गरजूंना ब्लँकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:13 IST2021-01-14T00:12:14+5:302021-01-14T00:13:04+5:30
इगतपुरी : शहरातील तळेगाव, टिटोली, गिरणारे भागात राहत असलेल्या आदिवासी व गरजू बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले.

गरजूंना ब्लँकेट वाटप
इगतपुरी : शहरातील तळेगाव, टिटोली, गिरणारे भागात राहत असलेल्या आदिवासी व गरजू बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले.
चंद्रिका गाला, सिनिअर सिटीझन ग्रुप, मुलुंड, मुंबई यांच्या सहकार्याने व जनसेवा प्रतिष्ठान, इगतपुरीच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक विवेक पंडित, अध्यक्ष आदिवासी विकास आढावा समिती यांच्या हस्ते गरजू ६१ आदिवासी कुटुंबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी अशोक नावंदर माजी उपनगराध्यक्ष, योगेश चांडक नगरसेवक, अनिल भोपे, सदस्य ग्रामपंचायत टिटोली, श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव, नाशिक जिल्हा अध्यक्ष रामभाऊ लोंढे, भगवान मधे, इगतपुरी तालुका अध्यक्ष संजय शिंदे, महिला प्रमुख नीता गावंडा, किसन चौरे, शांताराम भगत, संतू ठोंबरे, सुनील वाघ, सीताराम गांवडा आदी पदाधिकारी उपस्थित होते.