विजय मिळवूनही भाजप लक्ष्यपूर्तीपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 12:50 IST2026-01-17T12:50:23+5:302026-01-17T12:50:23+5:30

संजय पाठक  नाशिक : गेल्यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या भाजपने यंदा नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी 'शंभर प्लस'ची घोषणा ...

Despite winning the Nashik Municipal Corporation election the BJP is far from achieving its goals | विजय मिळवूनही भाजप लक्ष्यपूर्तीपासून दूर

विजय मिळवूनही भाजप लक्ष्यपूर्तीपासून दूर

संजय पाठक 

नाशिक : गेल्यावेळी महापालिकेच्या निवडणुकीत निर्विवाद बहुमत मिळवणाऱ्या भाजपने यंदा नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी 'शंभर प्लस'ची घोषणा केली. भाजपची उमेदवारी म्हणजे विजय निश्चित असे वातावरणही झाले. परंतु ऐनवेळचा एबी फॉर्म वाटपाचा गोंधळ, अतिरिक्त आयारामांची संख्या त्यामुळे झालेले पक्ष बदल शिंदेसेनेच्या पथ्यावर पडला. यानंतरही भाजपने ७० हून अधिक जागा मिळवून अव्वल क्रमांक कायम ठेवला आहे. भाजपला आता मित्रपक्षांची मदत न घेता पूर्णक्षमतेने सत्ता राबविता येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून हेच भाजपला हेच अपेक्षित होते.

महापालिकेच्या निवडणुकीत १२२ जागांपैकी शंभरहून अधिक जागा मिळवण्याचे भाजपचे स्वप्न होते. मात्र, हा जादुई आकडा भाजप मिळवू शकली नाही. गेल्यावेळी ६६ जागा मिळाल्यानंतर भाजपकडे यंदा येणाऱ्या मातब्बर इच्छुकांची संख्या बघता शंभर प्लसचा नारा खराही होऊन जाईल, अशी स्थिती होती. त्यामुळे नाशिकमध्ये भाजपने नावाला महायुतीसाठी शिंदेसेना आणि राष्ट्रवादीची चर्चा केली. त्यामुळे दोन्ही पक्षांनी युती तर केलीच; परंतु कुंभमेळ्यातील कामांची अनियमितता, तपोवनातील वृक्षतोड या मुद्द्यांना ठाकरे बंधूंनीही फुंकर घातली. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना अपेक्षित असलेले विकासाच्या कामांची माहिती दिली, तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी निवडणुकीची व्यूहरचना करतानाच तपोवनात अयोध्येच्या धर्तीवर श्रीराम मंदिर उभारण्याची केलेली घोषणादेखील गेमचेंजर ठरली.

भाजपच नंबर वन सिद्ध 

नगरपालिकेत अकरा नगराध्यक्षांच्या निवडणुकीत शिंदेसेनेने ५ जागा पटकाविल्या होत्या, तर भाजपने ३ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ३ जागा मिळविल्या. त्यामुळे ग्रामीण भागात शिंदेसेनेने बाजी मारल्याचे चित्र होते. महापालिका निवडणुकीत मात्र, भाजपने ७०हून अधिक जागा मिळवून बाजी मारल्याने शहरी भागामध्ये भाजपच नंबर वन असल्याचे सिद्ध केले. नाशिक भाजपत नाराजीचे वातावरण असले तरी महाजनच भाजपचे पालक असल्याचे सिद्ध झाले.

भाजप ७२

शिंदेसेना  २६ 

काँग्रेस ३

राष्ट्रवादी अजित पवार ४

राष्ट्रवादी शरद पवार ००

उद्धवसेना १५

मनसे ०१

एमआयएम ००

इतर ००
 

Web Title : जीत के बावजूद, नाशिक में भाजपा लक्ष्य से पीछे

Web Summary : भाजपा ने नाशिक जीता, लेकिन '100 प्लस' लक्ष्य से पीछे रही। आंतरिक मुद्दे और शिवसेना के लाभ ने परिणामों को प्रभावित किया। भाजपा अभी भी प्रमुख है, पूर्ण शक्ति के लिए सहयोगियों की आवश्यकता है, आगामी कुंभ मेला परियोजनाओं पर नजर है।

Web Title : Despite Victory, BJP Falls Short of Target in Nashik

Web Summary : BJP won Nashik, falling short of its ambitious '100 plus' goal. Internal issues and Shiv Sena's gains impacted results. BJP remains dominant, needing allies for full power, eyeing upcoming Kumbh Mela projects.