गोंधळच गोंधळ...! नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ, मतदान यंत्रातही बिघाड, सुरुवातीला संथ गतीने मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 09:34 IST2026-01-15T09:24:42+5:302026-01-15T09:34:33+5:30
काही मतदारांचे प्रभाग देखील बदलण्यात आले असून काहींच्या घराजवळचे मतदान केंद्र सोडून दुसऱ्या प्रभागाच्या हद्दीजवळ मतदान केंद्र देण्यात आले आहेत...

गोंधळच गोंधळ...! नाशिकमध्ये मतदार याद्यांचा घोळ, मतदान यंत्रातही बिघाड, सुरुवातीला संथ गतीने मतदान
नाशिक- महानगरपालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले आहे. मात्र, बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांची नावे सापडत नसल्यामुळे किंवा अगोदरच्या मतदान केंद्रा ऐवजी भलत्याच ठिकाणी दूरवरील केंद्रावर मतदाराची नाव असल्यामुळे गोंधळ असल्याचे चित्र आहेत.
काही मतदारांचे प्रभाग देखील बदलण्यात आले असून काहींच्या घराजवळचे मतदान केंद्र सोडून दुसऱ्या प्रभागाच्या हद्दीजवळ मतदान केंद्र देण्यात आले आहेत कुटुंबातील बहुतांशी सदस्यांची फाटाफूट करण्यात आल्याने गोंधळाचे वातावरण आहे. अनेक मतदार त्यामुळे मतदान न करताच परत जात आहेत.
दरम्यान शहरातील आनंदवली येथील मतदान केंद्रावर ईव्हीएमचा बिघाड झाला तसेच सिडकोतील प्रभाग 25 मध्ये एका मतदान केंद्रावर चार पैकी एकच ईव्हीएम सुरू असल्यामुळे सुमारे तासभर मतदान ठप्प होते अखेरीस नवीन ईव्हीएम आणल्यानंतर मतदान सुरू झाले