वणी येथे भागवत कथा पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:36 IST2020-08-27T23:35:59+5:302020-08-28T00:36:42+5:30
वणी : गेल्या ४६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या भागवत कथा सप्ताहास खंड पडू नये यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात कथेऐवजी भागवत पारायणास जगदंबादेवी मंदिर सभागृहात प्रारंभ करण्यात आला.

वणी येथे भागवत कथा पारायण
ठळक मुद्देभागवताचार्य वे.शा. सं. वासुदेव गुरु जी यांच्या हस्ते पूजन
वणी : गेल्या ४६ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या भागवत कथा सप्ताहास खंड पडू नये यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात कथेऐवजी भागवत पारायणास जगदंबादेवी मंदिर सभागृहात प्रारंभ करण्यात आला.
स्वर्गीय रामानंद महाराज यांच्या प्रेरणेने येथील भागवत कथा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही परंपरा खंडित होऊ नये म्हणून शारीरिक अंतर राखत व मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत भागवत पारायणाला प्रारंभ करण्यात आला. भागवताचार्य वे.शा. सं. वासुदेव गुरु जी यांच्या हस्ते पूजन करून पारायणास सुरु वात करण्यात आली.