रागविल्याने संतापाच्या भरात मुलाने बापाला संपविले

By मनोज शेलार | Updated: June 14, 2024 20:07 IST2024-06-14T20:07:37+5:302024-06-14T20:07:48+5:30

नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Out of anger, the son killed his father | रागविल्याने संतापाच्या भरात मुलाने बापाला संपविले

रागविल्याने संतापाच्या भरात मुलाने बापाला संपविले

नंदुरबार: घरगुती कारणावरून बोलल्याचा राग येऊन मुलाने बापाला बेदम मारहाण करून ठार मारल्याची घटना बारी, ता. नवापूर येथे घडली. याबाबत लहान मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून मोठ्या मुलाविरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उकड्या देवल्या नाईक (४२, रा.बारी, ता.नवापूर) असे मयताचे नाव आहे, तर रोहित नाईक (२०) असे संशयिताचे नाव आहे. पोलिस सूत्रांनुसार, बारी येथे उकड्या नाईक यांचा परिवार राहतो. परिवारातील रोहित व उकड्या यांच्यात नेहमीच वाद होत होता. गुरुवारी (दि. १३) सायंकाळी ७ वाजता उकड्या यांनी घर सारवून घ्यावे, घरात कुणीच कामाचे नाही असे रागावून घराबाहेर पडले. त्यावेळी रोहित याला राग आला. त्याने उकड्या यास आज मारूनच टाकतो, असे सांगून त्याच्यामागे लाकडी काठी घेऊन गेला व बेदम मारहाण केली.

मयताची पत्नी देवलीबाई ही सोडविण्यास गेली असता तिलादेखील मारहाण करण्यात आली. बेदम मारहाणीमुळे त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यांना नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केेले. घरी आणल्यानंतर पोलिसपाटलांनी नवापूर पोलिसांना कळविल्यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शव चिकित्सेसाठी नेण्यात आले. त्यानंतर परवीन उकड्या नाईक याने फिर्याद दिल्यावर नवापूर पोलिसात रोहित नाईक याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Out of anger, the son killed his father