Nandurbar Lok Sabha Election Results 2019: BJP's Heena Gavit, Junkley, BJP in Nandurbar | नंदुरबार लोकसभा निवडणुक निकाल 2019: भाजपाच्या हीना गावित जिंकल्या, नंदुरबारमध्ये भाजपानेच गुलाल उधळला
नंदुरबार लोकसभा निवडणुक निकाल 2019: भाजपाच्या हीना गावित जिंकल्या, नंदुरबारमध्ये भाजपानेच गुलाल उधळला

नंदुरबार - नंदुरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ़ हिना गावीत यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे़. त्यांनी जवळपास 95,296 मतांनी विजय मिळवला आहे. अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांना 5 लाख 41 हजार 930 तर डॉ़ हिना गावीत यांना 6 लाख 37 हजार 226 इतकी मते मिळाली आहेत. २७ व्या फेरिनंतरची ही आकडेवारी आहे. दरम्यान, सकाळी 8 वाजेपासून सुरुवातीला टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. 

काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या डॉ. हिना गावित आणि काँग्रेसच्या अ‍ॅड. के.सी. पाडवी यांच्यात मुख्य लढत झाली. 1951 पासून 2014 पर्यन्त या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार विजयी झाला आहे. तर, गतवर्र्षीच्या म्हणजेच 2014च्या निवडणुकीत पहिल्यांदाच कमळ उमललं होतं. या यशाची पुनरावृत्ती डॉ. हिना गावित यांनी केली. हीना गावित सलग दुसर्‍यांदा भाजपकडून या मतदारसंघात खासदार बनल्या आहेत.

विदर्भातील नंदुरबार लोकसभा मतदारसंघात डॉ. हिना गावित यांच्या उमेदवारीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हिना गावित आणि अ‍ॅड. केसी पाडवी यांच्यातील मुख्य लढतीत नंदुरबारमध्ये कोण गुलाल उधळणार याची उत्सुकता महाराष्ट्रातील जनतेला लागली होती. पहिल्या फेरीनंतर अ‍ॅड.केसी पाडवी यांनी आघाडी घेतली होती.त्यामुळे हिना गावित यांची सीट धोक्यात असल्याच मानन्यात येत होते. गेल्या निवडणुकीत हिना गावित यांनी 5 लाख 79 हजार 486 मतं घेत विजय मिळवला होता. मात्र, काही वेळातच चित्र बदलल्याचे दिसून येत आहे. गावित यांना पहिल्या फेरीतील पिछाडीनंतर पुन्हा मोठी आघाडी मिळाली आहे. जवळपास 40 हजार मतांनी आघाडी घेत हीना गवीत पुन्हा एकदा खासदार बनण्याकडे वाटचाल करताना दिसल्या. त्यानंतर, हीना गवित यांनी आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखत अखेर 95 हजार मतांनी विजय मिळवला. दरम्यान, नंदुरबार मतदारसंघात एकूण 18 लाख 70 हजार 117 मतदार असून नंदुरबारमध्ये 68.33 टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार येथील खोडाई माता रस्त्यावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली होती. मतदान केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे़. 

 

 

English summary :
Nandurbar Lok Sabha election Winner 2019: BJP's candidate Dr. heena gavit won by almost 95,296 votes. KC Padvi received 5 lakh 41 thousand 930 and Dr. heena gavit got 6 lakh 37 thousand 226 votes.


Web Title: Nandurbar Lok Sabha Election Results 2019: BJP's Heena Gavit, Junkley, BJP in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.