नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: June 4, 2024 03:04 PM2024-06-04T15:04:33+5:302024-06-04T15:07:08+5:30

Nandurbar Lok Sabha Election Result 2024 : आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसने मोठी आघाडी कायम ठेवली आहे.

nandurbar lok sabha election result 2024 congress victory in nandurbar maharashtra first result likely to be announced soon | नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता 

रमाकांत पाटील, नंदुरबार :नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ॲड.गोवाल पाडवी हे मतमोजणीच्या २४ व्या फेरीअखेर एक लाख ६२ हजार मतांनी आघाडीवर असून आता केवळ ५० हजार मतांची मोजणी शिल्लक राहिल्याने ॲड.गोवाल पाडवी यांचा विजय निश्चित झाला आहे. महाराष्ट्रातील हा पहिला निकाल मानला जात आहे.

आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून काँग्रेसने मोठी आघाडी कायम ठेवली आहे. आतापर्यंत मतमोजणीच्या २४ फेऱ्या झाल्या असून त्यात केवळ दोन फेऱ्यांच्या मतमोजणीत भाजपला आघाडी मिळाली. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे ॲड.गोवाल पाडवी हे एक लाख ६२ हजार मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीसाठी केवळ ५० हजार मते शिल्लक आहेत. तासाभरात अधिकृत निकाल जाहीर होणार असला तरी ॲड.गोवाल पाडवी यांचा विजय निश्चित झाल्याने काँग्रेस समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरू केला आहे.

Web Title: nandurbar lok sabha election result 2024 congress victory in nandurbar maharashtra first result likely to be announced soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.