"जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ..."; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 09:22 IST2026-01-06T09:19:37+5:302026-01-06T09:22:30+5:30
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून प्रचार सभा सुरू आहेत. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे.

"जे शरद पवारांचे झाले नाहीत ते तुमचे ..."; ओवेसींची अजित पवार यांच्यावर टीका
राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू असून प्रचार सभा सुरू आहेत. नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. दरम्यान, लोकसभा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची काल नांदेडमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. " जे शरद पवार यांचे झाले नाहीत ते नांदेडचे कसे होतील, अशी टीका त्यांनी केली. तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला.
एआयएमआयएमचे प्रमुख ओवेसी म्हणाले, "सय्यद मोईन आणि फिरोज लाला म्हणत होते की अजित पवारांचाही उमेदवार आहे. अजित पवार, जर तुम्ही शरद पवारांचे झाले नाही तर तुम्ही नांदेडचे कसे व्हाल? ज्या माणसाने तुम्हाला वाढवले, तुम्हाला स्थान दिले आणि तुमचा आदर केला, त्याला तुम्ही घरी सोडून पुढे गेलात. ही अजित पवारांची ओळख आहे, असा निशाणा ओवेसी यांनी लगावला.
घोटाळ्याचे आरोप
ओवेसी म्हणाले, "तुम्ही स्वतः उभे राहून म्हणता की तुमच्यावर ७५,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. काय झाले? हो, अजित पवार, तुमचे नाव अजित पवार आहे. जर ते मुस्लिम नाव असते तर तुम्ही ७५ वर्षे तुरुंगात असता. सत्तेत असलेल्या आणि अत्याचारित मुस्लिमांमध्ये हाच फरक आहे."
शरद पवारांच्या खासदारकीवर प्रश्न
काल ओवेसी यांनी खासदार शरद पवार यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शरद पवारांकडे आवश्यक संख्याबळ नाही.
ओवेसी म्हणाले, "पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ किती आहे? मार्चपर्यंत. त्यांच्याकडे संख्याबळ कुठे आहे? त्यांच्या युतीत पुरेसे आमदार कुठे आहेत? जर ते गेले तर ते कसे जातील? त्यांनी हे विचारले पाहिजे. जर पवार पुन्हा राज्यसभेत गेले तर ते कसे जातील? त्यांना संख्याबळाची गरज आहे, बरोबर? मग तुम्हाला कळेल." आता एक तमाशा होईल, फक्त पहा, असंही ओवेसी म्हणाले.