'भाजपला रावणाचा अहंकार, निवडणुकीत धडा शिकवा' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:26 IST2026-01-07T14:25:31+5:302026-01-07T14:26:02+5:30
Nagpur : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी काँग्रेस ही विचाराची व सत्याची लढाई लढत आहे. संविधानाला मानणारा पक्ष आहे. दुसरीकडे संविधानाला न मानणाऱ्या भाजपला सत्ता आणि पैशाचा अहंकार झाला आहे.

'Teach BJP a lesson in the elections, like Ravana's arrogance', appeals Congress state president Harshvardhan Sapkal
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारी काँग्रेस ही विचाराची व सत्याची लढाई लढत आहे. संविधानाला मानणारा पक्ष आहे. दुसरीकडे संविधानाला न मानणाऱ्या भाजपला सत्ता आणि पैशाचा अहंकार झाला आहे. रावणालाही असाच अहंकार झाला होता. अहंकारी भाजपला महापालिका निवडणुकीत धडा शिकवा, महापालिकेत काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
काँग्रेस उमेदवारांना मार्गदर्शनासाठी मंगळवारी महाकाळकर सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली. व्यासपीठावर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे, काँग्रेसचे निरीक्षक रणजित कांबळे, राज्य सहप्रभारी कुणाल चौधरी, आ. अॅड. अभिजित वंजारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, नारायण कांबळे, उमाकांत अग्निहोत्री, किशोर कन्हेरे, संदेश सिंगलकर आदी उपस्थित होते.
सपकाळ म्हणाले, यावेळी प्रथमच नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षात कुठलाही वाद न होता सर्वांच्या संमतीने तिकीट वाटप झाले. निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. अशीच एकजूट निवडणूक प्रचारात दाखवून महापालिकेत सत्तापरिवर्तन करून काँग्रेसचा महापौर बसवा, असे आवाहन त्यांनी केले. भाजपने सत्ता, पैसा व निवडणूक आयोगाचा वापर केल्यानंतरही नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगला कौल मिळाला. ४१ नगराध्यक्षांसह १००६ नगरसेवक विजयी झाले. नगरसेवकांच्या दोन हजार जागांवर काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा झंझावात आता महापालिकेच्या
एकट्याने प्रचार केला तर कारवाई
निवडणुकीचा प्रचार करताना पॅनलमधील चारही उमेदवारांनी संयुक्त प्रचार केला तर यश निश्चित आहे. एकट्याने प्रचार केला तर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
देवाभाऊ नाही तर टक्काभाऊ....
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील गावात एका शेतात ड्रग्जचा मोठा कारखाना सापडला. मुंबई क्राईम बँचने कारवाई करत ४० कामगारांना ताब्यात घेतले; पण एकनाथ शिंदे यांचे पुत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी हस्तक्षेप करून त्या कामगारांना सोडण्यास भाग पाडले. एवढा मोठा ड्रग्ज कारखाना सापडूनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना क्लीन चिट देऊन टाकली. फडणवीस हे देवाभाऊ नाही तर टक्काभाऊ आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली.