नागपुरातील ८ तर रामटेकमधील ५ उमेदवारांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:31 IST2019-04-01T23:27:15+5:302019-04-01T23:31:03+5:30
निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याबाबत निवडणूक विभागाने नागपूर लोकसभा मतदार संघातील ८ उमेदवार तर रामटेकमधील ५ उमेदवारांना नोटीस सादर केली आहे.

नागपुरातील ८ तर रामटेकमधील ५ उमेदवारांना नोटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक खर्चाचा हिशोब सादर न केल्याबाबत निवडणूक विभागाने नागपूर लोकसभा मतदार संघातील ८ उमेदवार तर रामटेकमधील ५ उमेदवारांना नोटीस सादर केली आहे.
लोकसभा निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांचा निवडणूक खर्चाचा लेख्याची प्रथम तपासणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आली होती. खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवारांना आपल्या निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करावयाचा होता. नियोजित वेळेत नागपूर लोकसभा मतदार संघातील एकूण ३० उमेदवारांपैकी २२ उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ८ उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी गैरहजर होते. तसेच रामटेकमधील एकूण १६ उमेदवारांपैकी ११ जण उपस्थित होते.तर ५ जण गैरहजर होते. गैरहजर उमेदवारांस लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील बाब क्रमांक ७७ मधील तरतुदीनुसार नोटीस बजावण्यात आली आहे. निवडणूक खर्चाच्या लेख्याची दुसरी हिशेब तपासणी ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे होईल, तेव्हा सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.