Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 21:45 IST2026-01-01T21:43:34+5:302026-01-01T21:45:04+5:30
Nagpur Municipal Corporation: कृष्णा खोपडे व रोहीत खोपडे यांनी अभिजीत वंजारींवर जोरदार टीका केली आहे.

Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
नागपूर : पुर्व नागपुरचे आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहीत याला भाजपने तिकीट न दिल्याच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसचे विधानपरिषद आमदार अभिजीत वंजारी यांनी कॉंग्रेसमधून लढण्याची ऑफर दिली होती. या मुद्यावरून कृष्णा खोपडे व रोहीत खोपडे यांनी अभिजीत वंजारींवर जोरदार टीका केली आहे. वंजारी यांनी स्वत: २०२४ च्या विधानसभा निवडणूकीतून पळ काढला होता. त्यांनी अगोदर स्वत:च्या पक्षाला सांभाळावे व मानसिकतेचा उपचार करावा या शब्दांत खोपडे पितापुत्रांनी हल्लाबोल केला.
अभिजित वंजारी यांनी रोहित खोपडेबद्दल केलेले वक्तव्य हास्यापद आहे. काँग्रेसमध्ये अनेक सक्षम कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय झाला आहे. त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांची उंची वाढविण्यावर भर द्यावा. काँग्रेसमधे घराणेशाही चालते व त्यातून आजवर अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले आहे. मनपाच्या निवडणूकीत कॉंग्रेस नेत्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून पैशाचा व लक्ष्मी दर्शन घेऊन अनेक मोठ्या लोकांना संधी दिली आहे. त्यामुळे वंजारी यांनी आपल्या पक्षाचा कार्यकर्त्यांना सांभाळावे असे खोपडे म्हणाले.
रोहित खोपडे हा युवा मोर्चाचा पदाधिकारी असून कार्यकर्त्याचा रूपाने त्याने उमेदवारी मागितली. पक्षाने संजय अवचट यांचा उमेदवारी देण्याचे ठरविल्यावर त्यावर त्याने अनुमोदक म्हणून सही केली व पक्षाचा निर्णयाचे स्वागत केले. वंजारी यांनी कुठला तरी शोध घेऊन बेजबाबदारीपणे भाष्य केले व कुटुंबामध्ये दुरावा निर्माण करण्याचे काम केले आहे. हीच कॉंग्रेसची संस्कृती आहे असे खोपडे म्हणाले. अभिजित वंजारी यांनी आपल्या मानसिकतेचा उपचार करावा असे प्रतिपादन रोहीत खोपडेने केले.