आमदार डॉ आशिषराव देशमुख यांचा दणका ! सावनेर झाले काँग्रेसमुक्त; सावनेर,कळमेश्वर, खापा येथे भाजपचे नगराध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 18:13 IST2025-12-21T18:11:23+5:302025-12-21T18:13:41+5:30
Nagpur : नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसला असून सावनेर या त्यांच्या बालेकिल्ल्यात, त्यांच्या मुळ गावात कॅाग्रेसला भोपळा मिळाला.

MLA Dr. Ashishrao Deshmukh's shock! Saoner becomes Congress-free; BJP mayors in Saoner, Kalmeshwar, Khapa
नागपूर : नगर परिषद निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर झाला. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात विकास कामांचा धडाका बघून सावनेर,कळमेश्वर, खापा येथील जनतेने प्रचंड मतांनी भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष तसेच सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून दिले.
मुख्य म्हणजे, नागपूर जिल्ह्यात काँग्रेस नेते सुनील केदार यांना मोठा धक्का बसला असून सावनेर या त्यांच्या बालेकिल्ल्यात, त्यांच्या मुळ गावात कॅाग्रेसला भोपळा मिळाला. काँग्रेसचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. सावनेरमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार संजना मंगळे विजयी झाल्या. सावनेरमध्ये भाजपचे २३ पैकी २१ नगरसेवक आणि स्थानिक आघाडीचे ०२ नगरसेवक निवडून आले. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी नागपूर जिल्ह्यात वर्चस्व असलेल्या सुनील केदार यांना दणका दिल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांच्या दमदार नेतृत्वावर आणि विकास कामांवर जनतेने विश्वास दाखविला आहे.
सावनेरसह कळमेश्वर व खापा येथे देखील भाजपने विजयाचा झेंडा रोवला आहे. भाजपचे अविनाश माकोडे कळमेश्वर येथून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. तिथे भाजपचे १५ व काँग्रेसचे ०६ नगरसेवक निवडून आले. भाजपचे पियुष बुरडे खापा येथून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कळमेश्वर व खापा येथे काँग्रेस तिसऱ्या नंबरवर फेकल्या गेली. आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी भाजपच्या सर्व विजयी नगराध्यक्षांचे आणि नगरसेवकांचे अभिनंदन केले आणि जनतेचे आभार व्यक्त केले.