चार अपत्ये असूनही मनपा निवडणुकीत उमेदवारी वैध कशी ? नागपूर मनपाच्या उमेदवारी अर्ज छाननीवर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 20:00 IST2026-01-09T19:59:45+5:302026-01-09T20:00:29+5:30
Nagpur : दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तीस स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येत नाही, असा स्पष्ट नियम असताना चार अपत्यांची आई असलेल्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात आल्याने महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

How is candidacy valid in the municipal elections despite having four children? Question mark on scrutiny of Nagpur Municipal Corporation's candidacy applications
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तीस स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवता येत नाही, असा स्पष्ट नियम असताना चार अपत्यांची आई असलेल्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्यात आल्याने महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही बाब उमेदवाराने स्वतः सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघड झाली असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे हे उदाहरण मानले जात आहे.
दक्षिण-पश्चिम नागपुरातील प्रभाग क्रमांक ३६ मधून 'क' गटात राष्ट्रवादी (शरद पवार) यांनी पुष्पा मुकेश वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. वाघमारे यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात चार अपत्ये असल्याचे नमूद केले असून, त्यापैकी दोन अपत्यांचा जन्म १२ सप्टेंबर २००१ नंतर झाल्याचे स्पष्ट केले आहे. नियमांनुसार हा अर्ज छाननीदरम्यान बाद होणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे न होता तो मंजूर करण्यात आला.
ही गंभीर चूक महापालिकेच्या लक्षात उशिरा आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २ जानेवारीपर्यंत असताना संबंधित प्रतिज्ञापत्र ६ जानेवारी रोजी महापालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. कागदपत्रे वेळेत उपलब्ध झाली असती तर विरोधक किंवा सजग नागरिकांकडून या बाबीकडे लक्ष्मीनगर झोनचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे यांनी या बाबीकडे लक्ष दिले जाईल, असे म्हटले आहे. मनपाच्या निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ही गंभीर प्रशासकीय चूक असल्याला दुजोरा दिला आहे. उमेदवाराने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची सखोल पडताळणी आमच्याकडून झाली नाही. आता त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला आहे.
याविरोधात कोणी न्यायालयात दाद मागितल्यास तेथील निर्णय होईपर्यंत उमेदवारी कायम राहील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रशासकीय निष्काळजीपणावर विविध राजकीय पक्ष व कार्यकर्त्यांकडून तीव्र टीका होत आहे. संबंधित उमेदवार निवडणुकीत विजयी झाल्यास, पुढे निर्माण होणाऱ्या कायदेशीर अडचणी अधिकच गुंतागुंतीच्या ठरणार आहेत.
नियमाची माहिती नव्हती : वाघमारे
पुष्पा वाघमारे यांनी नियमाची माहिती नसल्याचा दावा केला आहे. चार अपत्ये असल्याची माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्रात दिली आहे. अर्ज भरताना कोणीही मला मार्गदर्शन केले नाही. नियमाची पूर्वकल्पना असती तर मी अर्जच भरला नसता, असे त्यांनी म्हटले. तसेच, यामुळे भविष्यात कोणत्या कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, याबाबत कोणीही मार्गदर्शन केले नसल्याचेही त्यांनी नमूद केले. लक्ष वेधले गेले असते आणि अर्ज बाद करण्याची मागणीही झाली असती. मात्र, अर्ज मान्य झाल्याने आता न्यायालयीन हस्तक्षेपाशिवाय या प्रकरणावर तोडगा निघणे अवघड आहे.