भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 05:38 IST2024-10-12T05:36:42+5:302024-10-12T05:38:26+5:30

अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या शिस्त बिघडून सर्व काम सुरू आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

congress vijay wadettiwar allegations that bjp leaders side track the dcm ajit pawar | भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वेळेला विविध खात्याचे मंत्री राहिले आहेत. त्यांनी अर्थ विभागात शिस्त निर्माण करण्याचे प्रयत्न केले. मात्र, सध्या शिस्त बिघडून सर्व काम सुरू आहे. पैसे नसताना जीआर  काढले गेले. हे निर्णय टक्केवारी मोजण्यासाठी केले जात आहेत. अजित पवार यांनी कुठे जावे, हा त्यांचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने त्यांची माणसे निघून जात आहेत, त्यामुळे ते अस्वस्थ आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले.


 

Web Title: congress vijay wadettiwar allegations that bjp leaders side track the dcm ajit pawar