महानगरपालिका निवडणुकीत जप्त रोख रकमेवर समिती घेणार निर्णय; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 17:17 IST2026-01-01T17:11:41+5:302026-01-01T17:17:23+5:30

Nagpur : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी १६ जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कागदपत्रांशिवाय निर्धारित रकमेपेक्षा जास्त रोख रक्कम आढळून आल्यास गठित समिती यावर निर्णय घेणार आहे.

Committee to take decision on cash seized in municipal elections; action against those violating code of conduct | महानगरपालिका निवडणुकीत जप्त रोख रकमेवर समिती घेणार निर्णय; आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

Committee to take decision on cash seized in municipal elections; action against those violating code of conduct

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी १६ जानेवारीपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत कागदपत्रांशिवाय निर्धारित रकमेपेक्षा जास्त रोख रक्कम आढळून आल्यास गठित समिती यावर निर्णय घेणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपाच्या आचारसंहिता कक्षाच्या भरारी पथकासह (एफएसटी) आणि स्थिर निगराणी पथकाद्वारे (एसएसटी) कारवाई केली जात आहे.

कारवाईदरम्यान पथकांद्वारे विविध ठिकाणी रोकड व इतर अनुषंगिक वस्तू जप्त केल्या जात असून, कक्षाकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंच्या विल्हेवाटीसाठी मनपा आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या आदेशानुसार मनपाच्या अतिरिक्त आयुक्त तथा आचारसंहिता नियंत्रण अधिकारी वैष्णवी बी. यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती गठित करण्यात आली आहे. 

समितीत उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्ष प्रमुख विजय पवार यांची सदस्य म्हणून, तर मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी तथा खर्च देखरेखीचे नोडल अधिकारी सदाशिव शेळके यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच समितीत सदस्य म्हणून निवडणूक खर्च कक्ष प्रमुख तथा उपमुख्य लेखा वित्त अधिकारी, जिल्हा परिषद सूरज कोषागार अधिकारी मोनाली भोयर आदींची समिती गठित करण्यात आली आहे.

सार्वत्रिक २०२५-२६ दरम्यान नागपूर महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण ठेवणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्याकरिता आचारसंहिता कक्ष कार्य करीत आहे. कक्षाच्या भरारी पथकासह (एफएसटी) आणि स्थिर निगराणी (एसएसटी) पथकांकडून निवडणुकी काळात वाहन तपासणी केली जात आहे.

कागदपत्रे सादर केली तरच मिळणार परत रक्कम

  • तपासणीत निर्धारित रकमेपेक्षा अधिक रक्कम व अनुषंगिक वस्तू आढळल्यास संबंधिताकडून आवश्यक ती कागदपत्रे मागितली जात आहेत.
  • संबंधित व्यक्ती कागदपत्रे व आवश्यक माहिती पुरविण्यास असमर्थ असल्यास आढळलेली रोकड थेट ताब्यात घेतली जाते. रोकड ताब्यात घेतल्यानंतर त्या रकमेबाबत पुढील चौकशी पोलिस आणि आयकर विभागामार्फत केली जाते.
  • चौकशीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या रोकड 3 रकमेबाबत योग्य ती कागदपत्रे सादर केल्यास चौकशीनंतर ही रोकड व अनुषंगिक वस्तू संबंधितांना परत करण्याबाबत निर्णय गठित संनियंत्रण समितीद्वारे घेण्यात येईल.
  • आचारसंहिता कक्ष प्रमुख विजय पवार यांचा भ्रमणध्वनी क्र. ७९७२४९०९६८ असून, या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : चुनाव में जब्त नकदी पर समिति लेगी फैसला; उल्लंघनकर्ताओं पर कार्रवाई

Web Summary : नगर निगम चुनाव के दौरान जब्त नकदी पर एक समिति निर्णय लेगी। उड़न दस्ते और स्थिर निगरानी दल आचार संहिता का उल्लंघन करने वालों पर कार्रवाई करेंगे। नागपुर नगर निगम ने जब्त वस्तुओं के निपटान के लिए एक निगरानी समिति का गठन किया है, जिससे निष्पक्ष चुनाव सुनिश्चित हो सके।

Web Title : Committee to Decide on Seized Cash in Election; Action on Violators

Web Summary : A committee will decide on seized cash during the municipal election. Action will be taken against code of conduct violators by flying squads and static surveillance teams. Nagpur Municipal Corporation has formed a monitoring committee for disposal of seized items, ensuring fair elections.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.