नागपूरमध्ये भाजपकडून तरुणतुर्काना संधी; दीड डझनाहून नगरसेवकांना डच्चू

By योगेश पांडे | Updated: December 30, 2025 12:35 IST2025-12-30T12:33:30+5:302025-12-30T12:35:04+5:30

यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचे वाटप : बंगाले, तभाने, टांक यांच्यासह अनेकांना धक्का, भाजपकडून उमेदवारीसाठी अठराशेहून अधिक होते इच्छुक

BJP gives opportunity to young Turks in Nagpur; More than a dozen corporators get elected | नागपूरमध्ये भाजपकडून तरुणतुर्काना संधी; दीड डझनाहून नगरसेवकांना डच्चू

BJP gives opportunity to young Turks in Nagpur; More than a dozen corporators get elected

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने अतिशय 'सेफ गेम' खेळत उमेदवारांची यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्मचे वाटप केले. बऱ्याच माजी नगरसेवकांना डच्चू देत भाजपकडून तरुणतुर्वांना संधी देण्यात आली आहे. माजी नगरसेवकांची मागील काही कालावधीतील निष्क्रियता, जनतेत त्यांच्याबाबत असलेला रोष यामुळे भाजपने नवीन चेहऱ्यांवर जास्त विश्वास टाकला आहे. सोमवारी ८०हून अधिक एबी फॉर्मचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचे विश्वासू संजय बंगाले, दीपराज पार्डीकर यांच्यासह अनेकांना पक्षाने धक्का दिला आहे.

भाजपकडून अठराशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते व मुलाखतीदेखील झाल्या होत्या. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर असतानादेखील यादी जाहीर न झाल्याने इच्छुकांमध्ये बेचैनी वाढली होती. पक्षाकडून दोन दिवसअगोदर जवळपास ३०० जणांना अर्ज दाखल करण्यासाठी तयार राहण्याचे संदेश देण्यात आले होते. मात्र, त्यातदेखील छाननी करण्यात आली व रात्री ८ वाजेपर्यंत जवळपास ९० जणांना फोन करून एबी फॉर्म घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलविण्यात आले.

एका प्रभागात 'वन्स मोअर'

भाजपने जवळपास सर्वच प्रभागांत नवीन चेहरे दिले असले तरी प्रभाग क्रमांक एकमध्ये मात्र २०१७ चेच चारही उमेदवार दिले आहेत. त्यात विरेंद्र कुकरेजा, प्रमिला माथरानी, सुषमा चौधरी, महेंद्रप्रसाद धनविजय यांचा समावेश आहे. माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके, अविनाश ठाकरे, नंदा जिचकार यांनी नवीन कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी विनंती केली होती. पक्षाने तेथे नवीन लोकांना संधी दिली आहे. प्रभाग १३ मधील चारही उमेदवार हे आमदार परिणय फुके यांच्या शिफारशीवरून देण्यात आले आहेत.


अकोल्यात भाजपचे राष्ट्रवादीशी जुळले

अकोला महापालिकेत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) व शिंदेसेना यांच्यातील वाटाघाटींना सोमवारी उशिरा निर्णायक वळण मिळाले. अजित पवार गट यांच्यात जागावाटपावर एकमत झाले.

अमरावतीः शिंदेसेनेला हव्यात जास्त जागा

अमरावती महापालिका निवडणुकीत नामनिर्देशन पत्र भरण्यास मंगळवार शेवटचा दिवस आहे. २२ प्रभागात ८७ सदस्य निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. मात्र भाजप-शिंदेसेनेत युतीत जागा वाटपावरून तिढा कायम आहे. भाजप शिंदेसेनेला कमी जागा देत असल्यामुळे माजी राज्यमंत्री जगदिश गुप्ता हे नाराज झाले. ते मंगळवारी पत्रपरिषदेतून भूमिका जाहीर करणार आहेत.

चंद्रपूर : आघाडीतील समन्वय कठीण

चंद्रपूर महापालिकेसाठी अर्ज भरण्याची मुदत जवळ येत असताना काँग्रेस व भाजपच्या उमेदवार याद्या जाहीर झालेल्या नाहीत. काँग्रेसमध्ये जागावाटपावर रस्सीखेच सुरू आहे. विजय वडेट्टीवार चंद्रपुरात ठाण मांडून आहेत.

भोयर, बेहते यांना धक्का

अनेक प्रभागांतील आरक्षण बदलले होते. मात्र, पक्षाकडून काही उमेदवारांना दुसऱ्या प्रभागात स्थान देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात पक्षाने काही माजी नगरसेवकांना मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा क्षेत्रातील प्रभाग ३६ मध्ये चारही चेहरे नवीन आहेत. माजी नगरसेवक लहूकुमार बेहते, पल्लवी शामकुळे, प्रकाश भोयर यांना एबी फॉर्म देण्यात आलेले नाहीत. प्रभाग ४ मध्ये राजकुमार साहू यांच्याऐवजी रामदास साहू यांना संधी देण्यात आली आहे. प्रभाग ११ मध्ये अर्चना पाठक यांना एबी फॉर्म न देता ममता ठाकूर यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. प्रभाग १३ मध्ये अमर बागडे यांना धक्का बसला आहे. प्रभाग १५ मध्ये संजय बंगाले, उज्ज्वला शर्मा यांना एबी फॉर्म मिळालेला नाही. प्रभाग १६ मध्ये वनिता दांडेकर यांच्याऐवजी त्यांचे सुनील यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. तर प्रभागाबाहेरील वर्षा चौधरी यांनाही संधी मिळाली आहे. प्रभाग २४ मध्ये चेतना टांक यांना मोठा धक्का बसला आहे. तर प्रभाग २६च्या माजी नगरसेविका समिता चकोले, मनीषा कोठे यांना कुठूनही संधी मिळालेली नाही. प्रभाग ३२ मध्ये अभय गोटेकर, दीपक चौधरी यांना एबी फॉर्म मिळालेला नाही, तर कल्पना कुंभलकर यांच्याऐवजी त्यांचे पती राम यांना संधी मिळाली आहे. प्रभाग ३५ मध्ये जयश्री वाडीभस्मे यांना एबी फॉर्म मिळालेला नाही. प्रभाग ३७ मध्ये माजी नगरसेवक प्रमोद तभाने, सोनाली कडू यांना कुठल्याही प्रभागातून संधी देण्यात आलेली नाही. 

एबी फॉर्म देण्यात आलेल्यांची नावे

प्रभाग १- विरेंद्र कुकरेजा, प्रमिला माथरानी, सुषमा चौधरी, महेंद्रप्रसाद धनविजय
प्रभाग २ - अनिकेत येरखेडे, नेहा निकोसे, पंकज यादव, सविता माने
प्रभाग ४ - शेषराव गोतमारे, निरंजना पाटील, मनीषा अतकरे, रामदास साहू
प्रभाग ५ - संजय चावरे
प्रभाग ७ - राखी मानवटकर, ओमप्रकाश इंगळे, नवनीत तुली, मीना तरारे
प्रभाग ८ - श्रेयस कुंभारे, तृप्ती खंगार, कामिल अन्सारी
प्रभाग ९ - मनोरमा जैस्वाल
प्रभाग ११ - भूषण शिंगणे, संगीता गिन्हे, संदीप जाधव, ममता ठाकूर
प्रभाग १२ - मायाताई इवनाते, साधना बरडे, दर्शनी धवड, विक्रम ग्वालबंशी
प्रभाग १३ - वर्षा ठाकरे, किसन गावंडे, योगेश पाचपोर, ऋतिका मसराम
प्रभाग १४ - प्रगती पाटील, माधुरी टेकाम, योगिता तेलंग, विनोद कन्हेरे
प्रभाग १५ - विनय दाणी, पूजा पाठक, धनश्री देशपांडे, सुनील हिरणवार
प्रभाग १६ - लखन येरवार, लक्ष्मी यादव, सुनील दांडेकर, वर्षा चौधरी
प्रभाग १७ - श्रद्धा चुटेले, प्रमोद चिखले, मोरेश्वर साबळे
प्रभाग १९ - संजयकुमार बालपांडे
प्रभाग २० - हेमंत बरडे, रेखा निमजे, स्विटी भिसीकर
प्रभाग २१ - विशा भोयर 
प्रभाग २३ - बाल्या बोरकर
प्रभाग २४ - दुर्गेश्वरी कोसेकर, अरुण हारोडे, प्रदीप पोहाणे, सरिता कावरे
प्रभाग २६ - धर्मपाल मेश्राम, सीमा ढोमणे, शारदा बारई, बंटी कुकडे
प्रभाग २८ - नंदा येवले, नीता ठाकरे, पिंटू झलके, किरण दातीर
प्रभाग २९ - लीलाताई हाथीबेड, योगेश मडावी, अजय बोडारे
प्रभाग ३१ - मंगला म्हस्के 
प्रभाग २३ - बाल्या बोरकर
प्रभाग २४ - दुर्गेश्वरी कोसेकर, अरुण हारोडे, प्रदीप पोहाणे, सरिता कावरे
प्रभाग २६ - धर्मपाल मेश्राम, सीमा ढोमणे, शारदा बारई, बंटी कुकडे
प्रभाग २८ - नंदा येवले, नीता ठाकरे, पिंटू झलके, किरण दातीर
प्रभाग २९ - लीलाताई हाथीबेड, योगेश मडावी, अजय बोडारे
प्रभाग ३२ - रितेश पांडे, रूपाली ठाकूर, रामभाऊ कुंभलकर, गुणप्रिया शेंडे
प्रभाग ३४ - मंगला खाखरे
प्रभाग ३५ - संदीप गवई, विशाखा मोहोड, रमेश भंडारी, पूजा भूगावकर
प्रभाग ३६ - ईश्वर ढेंगळे, अमोल शामकुळे, शिवानी दाणी, माया हाडे
प्रभाग ३७ - अश्विनी जिचकार, निधी तेलगोटे, दिलीप दिवे, संजय उगले
प्रभाग ३८ - महेश्वरी पटले, आनंद नितनवरे, प्रतिभा राऊत
 

Web Title : नागपुर में भाजपा ने युवाओं को मौका दिया, कई पार्षदों को हटाया।

Web Summary : नागपुर चुनाव में भाजपा ने युवाओं को प्राथमिकता दी, निष्क्रियता और जनता की असंतुष्टि के कारण कई पार्षदों को टिकट नहीं दिया। पार्टी ने एबी फॉर्म वितरित किए, नए चेहरों को प्राथमिकता दी। अकोला में सहयोगियों ने सीट बंटवारे को अंतिम रूप दिया। अमरावती में शिंदे सेना के साथ सीट आवंटन पर तनाव बढ़ गया।

Web Title : BJP gives opportunity to youth in Nagpur, many corporators dropped.

Web Summary : BJP favored youth in Nagpur elections, denying tickets to many corporators due to inactivity and public dissatisfaction. The party distributed AB forms, prioritizing fresh faces. Allies in Akola finalize seat sharing. Tensions rise in Amravati over seat allocation with Shinde Sena.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.