मालाड स्थानकाबाहेर धक्कादायक प्रकार; भररस्त्यात रिक्षा अडवून तरुणींसह तिघांवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 15:19 IST2026-03-23T15:18:23+5:302026-03-23T15:19:25+5:30

मालाड पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेर २० मार्च रोजी रिक्षात बसण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

Shocking incident outside Malad station; Three people, including a young woman, were attacked by stopping rickshaw | मालाड स्थानकाबाहेर धक्कादायक प्रकार; भररस्त्यात रिक्षा अडवून तरुणींसह तिघांवर हल्ला

मालाड स्थानकाबाहेर धक्कादायक प्रकार; भररस्त्यात रिक्षा अडवून तरुणींसह तिघांवर हल्ला

मालाड पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेर २० मार्च रोजी रिक्षात बसण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रिक्षा अडवून भररस्त्यात मारहाण केल्याप्रकरणी कुरार पोलिसांनी तीन महिलांसह १२ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार किंजल गोहेल (२२) या २० मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मैत्रीण पूजा शाह, कशिष शाह आणि मित्र देव शाह यांच्यासह मालाड पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षासाठी रांगेत उभ्या होत्या.

दोन महिलांनी त्यावेळी रांग मोडून त्यांच्या रिक्षात बसण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्या महिलांनी शिवीगाळ करून धमकी देत रिक्षाने निघून गेल्या. यानंतर किंजल आणि त्यांच्या सोबत्यांनी दुसरी रिक्षा घेऊन घरी निघाले.

२० जणांनी घेरले

रात्री आठच्या सुमारास लक्ष्मणनगर येथील मयूर ज्वेलर्ससमोर त्या दोन महिलांनी त्यांची रिक्षा अडवली. त्यावेळी त्यांच्यासोबत २० ते २५ अनोळखी लोक होते. या सर्वांनी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना रिक्षातून ओढून काढत मारहाण केली, तसेच शिवीगाळ व दमदाटी केली.

१२ जणांवर गुन्हा दाखल

मारहाणीत देव यांना काही लोकांनी तसेच किंजल यांच्या मैत्रिणी पूजा आणि कशिष यांनाही दोन महिलांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर चौकशी करत कुरार पोलिस ठाण्यात १२ जणांवर मारहाण, शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title : मलाड: रिक्शा विवाद के बाद हमला, कई घायल

Web Summary : मलाड में रिक्शा को लेकर विवाद हिंसक हमले में बदल गया। मलाड स्टेशन के पास 20-25 लोगों के एक समूह ने तीन युवतियों और एक युवक पर हमला किया, जिसमें वे घायल हो गए। पुलिस ने तीन महिलाओं सहित बारह लोगों के खिलाफ मारपीट और धमकी देने का मामला दर्ज किया है।

Web Title : Malad: Group Attack After Argument Over Rickshaw; Several Injured

Web Summary : A dispute over a rickshaw in Malad escalated into a violent attack. A group of 20-25 people assaulted three young women and a man near Malad station, resulting in injuries. Police have registered a case against twelve individuals, including three women, for assault and intimidation.