सात महिन्यांच्या बाळाची कोविडसह ट्युमरशी यशस्वी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 03:32 AM2021-05-09T03:32:11+5:302021-05-09T06:58:06+5:30

रुग्णालयाच्या प्रमुख बालरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले, १५ एप्रिलला बाळाला रुग्णालयात दाखल केले. त्याला  ‘टेराटोमा’ नावाचा ट्युमर हाेता.

Seven month old boy Successful fight with tumor and corona | सात महिन्यांच्या बाळाची कोविडसह ट्युमरशी यशस्वी झुंज

सात महिन्यांच्या बाळाची कोविडसह ट्युमरशी यशस्वी झुंज

Next

मुंबई: अवघ्या सात महिन्यांच्या बाळाला कोविड संक्रमणाची लागण झाली हाेती. त्याच्या छातीमध्ये १५ सें.मी. आकाराचा दुर्मीळ ट्यूमर आढळून आला. या बाळावर परेल येथील वाडिया रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आल्याने त्याला नवे आयुष्य मिळाले आहे. (Seven month old boy Successful fight with tumor and corona)

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील दाम्पत्याच्या घरात या बाळाचा जन्म झाला; यामुळे हे दाम्पत्य आनंदात हाेते. मात्र जेव्हा बाळ दोन महिन्यांचे झाले तेव्हा त्याचे सततचे रडणे, श्वासोच्छ्वासात अडचणी येणे, आदी समस्या बाळाला जाणवू लागल्या. त्याला दूधही पिता येईना. यामुळे बाळ अशक्त होऊ लागले. स्थानिक डाॅक्टरांनी बाळाला ‘टेराटोमा’ नावाचा दुर्मीळ ट्युमर असल्याचे निदान केले. त्यानंतर बाळाच्या पालकांनी त्याला परळ येथील वाडिया रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले.

रुग्णालयाच्या प्रमुख बालरोग शल्यचिकित्सक डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले, १५ एप्रिलला बाळाला रुग्णालयात दाखल केले. त्याला  ‘टेराटोमा’ नावाचा ट्युमर हाेता. सर्वांत प्रथम आम्ही बाळाची कोविड चाचणी केली ती पाॅझिटिव्ह आल्याने बाळाला आठ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले. उपचाराअंती पुन्हा चाचणी केली. ती निगेटिव्ह आली. त्यानंतरच बाळावर शस्त्रक्रिया केली.

हृदयाच्या काही भागावर गंभीर परिणाम
बाळ श्वास घेण्यास घाबरत होते. आईचे दूध त्याला पिता येत नव्हते. सीटी स्कॅन चाचणीत असे दिसून आले की, बाळाची दोन्ही फुप्फुसे, हृदयाच्या काही भाग आणि शरीरातील सर्वांत मोठी धमनी या साऱ्यांवर ट्युमरमुळे गंभीर परिणाम झाला होता, असे डॉ. प्रज्ञा बेंद्रे यांनी सांगितले; तर वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला सांगतात, या बाळाला असह्य वेदना होत होत्या. सर्वप्रथम त्याला कोविडमुक्त करणे गरजेचे हाेते; कारण कोविड संक्रमणामुळे हे बाळ श्वास घेऊ शकत नव्हते आणि त्यानंतर ट्युमर काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Seven month old boy Successful fight with tumor and corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app