उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांचा दणदणीत विजय; प्रिया दत्त पुन्हा पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:25 PM2019-05-23T22:25:43+5:302019-05-23T22:30:08+5:30

महाजन जवळपास 1 लाख 30 हजार मतांनी विजयी

Mumbai North Central Lok Sabha Result 2019 bjps Poonam Mahajan defeats congress leader priya dutt | उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांचा दणदणीत विजय; प्रिया दत्त पुन्हा पराभूत

उत्तर मध्य मुंबई लोकसभा निकाल 2019: पूनम महाजनांचा दणदणीत विजय; प्रिया दत्त पुन्हा पराभूत

Next

मुंबई: उत्तर मध्य मुंबईत भाजपाच्यापूनम महाजन यांनी जवळपास 1 लाख 30 हजार मतांनी विजय मिळवला. महाजन यांना 4 लाख 85 हजार 815, तर दत्त यांना 3 लाख 56 हजार 298 मतं मिळाली. गेल्या निवडणुकीतही महाजन यांनी दत्त यांचा पराभव केला होता. 

केंद्रात मंत्रीपद भूषवलेल्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या लेकींमधील चुरस उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात पाहायला मिळाली. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या आमनेसामने असलेल्या भाजपाच्यापूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांनी यंदाही एकमेकांना आव्हान दिलं होतं. आजी-माजी खासदारांच्या या लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाजन यांनी मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासून आघाडी घेतली. ती आघाडी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली. 

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील यंदा मतदानाचा टक्का घसरला. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात 53.64 टक्के मतदान झालं होतं. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात 55 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घसरला. 
 

Web Title: Mumbai North Central Lok Sabha Result 2019 bjps Poonam Mahajan defeats congress leader priya dutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.