Mumbai Accident video: मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा स्लॅब वाहनांवर कोसळला; रिक्षाचा चेंदामेंदा, दोन जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 13:44 IST2026-02-14T13:43:30+5:302026-02-14T13:44:59+5:30
Mumbai Latest news: मुंबईतील मुलुंडमध्ये मेट्रोच्या पुलाचा स्लॅब कोसळला. वर्दळ असतानाच ही घटना घडली. यात वाहनांचे नुकसान झाले असून, काही जण जखमी झाले आहेत.

Mumbai Accident video: मुलुंडमध्ये मेट्रोच्या पिलरचा स्लॅब वाहनांवर कोसळला; रिक्षाचा चेंदामेंदा, दोन जण ठार
मुंबईतील मुलुंड पश्चिम परिसरात शनिवारी दुपारी दुर्दैवी घटना घडली. बांधकाम सुरू असलेल्या मेट्रोच्या पिलरचा काही भाग अचानक कोसळला आणि तो खालून जात असलेल्या रिक्षासह इतर काही वाहनांवर कोसळला. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत.
मुंबईतील मुलुंड पश्चिम भागात आज (१४ फेब्रवारी) दुपारी एक भीषण दुर्घटना घडली. लाल बहादूर शास्त्री मार्गावर मेट्रोचे काम सुरू असताना सिमेंटच्या पिलरचा एक मोठा भाग अचानक कोसळला. हा राडारोडा थेट चालत्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, यामध्ये ३ ते ४ प्रवासी जखमी झाले होते. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मुलुंड पश्चिमेला मेट्रो स्लॅब कोसळला..
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 14, 2026
गाड्यांचे नुकसान #मेट्रो#मुलुंडpic.twitter.com/l4H8eeCEKW
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ वाजून २० मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. मुलुंडमधील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रो मार्गिकेचे बांधकाम सुरू आहे. यावेळी पिलरचा काही भाग निखळला आणि खालून जाणाऱ्या एका रिक्षावर कोसळला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बचावकार्य आणि यंत्रणांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल स्थानिक पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.
🚨 Mumbai Metro Line-4 concrete slab has fallen on cars below on LBS Marg, Mulund West near Johnson & Johnson/Oberoi. 1:15 PM.
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) February 14, 2026
Immediate site safety action needed. @MMRDAOfficial@mybmc@MTPHereToHelppic.twitter.com/mSaC5eaYeF
जखमींची अवस्था: रिक्षात अडकलेल्या ३ ते ४ प्रवाशांना तातडीने बाहेर काढून '१०८' रुग्णवाहिकेमार्फत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
STORY | Part of metro rail pillar collapses in Mumbai's Mulund area; 3-4 persons feared injured
Three to four persons are feared injured after a portion of a pillar of an under-construction metro rail route in Mulund in north-east Mumbai collapsed on Saturday afternoon, a fire… pic.twitter.com/f31K3vsYNj— Press Trust of India (@PTI_News) February 14, 2026
यंत्रणा सज्ज: मेट्रोचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन घटनास्थळावरून ढिगारा हटवण्याचे काम करत असून पुढील तपास सुरू आहे.
वाहतुकीवर मोठा परिणाम
एलबीएस मार्ग हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असल्याने या अपघातामुळे मुलुंड परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांनी वाहनधारकांना या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.