कुठे पती-पत्नी, कुठे बाप-लेक तर, कुठे जावा-जावा! उल्हासनगर निवडणुकीच्या रणांगणात 'महाभारत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:31 IST2026-01-08T19:25:40+5:302026-01-08T19:31:09+5:30
Ulhasnagar Municipal Corporation Election: उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत पती-पत्नी, बापलेक, बापबेटी, भाऊ-भाऊ, आई-मुलगा, जावा जावा अश्या जोड्या रिंगणात उतरल्याने रणधुमाळीत रंगत आली.

कुठे पती-पत्नी, कुठे बाप-लेक तर, कुठे जावा-जावा! उल्हासनगर निवडणुकीच्या रणांगणात 'महाभारत'
उल्हासनगर: निवडणुकीत पती-पत्नी, बापलेक, बापबेटी, भाऊ-भाऊ, आई-मुलगा, जावा जावा अश्या जोड्या रिंगणात उतरल्याने रणधुमाळीत रंगत आली. एकाच घरा तीन तिकिटे देण्याचा चार प्रकार तर एकाच घरात दोन तिकिटे पक्षाने दिल्याने,त्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत.
उल्हासनगर भाजपाकडून प्रभाग क्रं-१६ व १७ मधून निवडणूक शेरी लुंड घरात -३, प्रभाग क्रं-१५ मधून धनंजय बोडारे कुटुंबातून -३ तर शिंदेसेनेकडून प्रभाग क्रं-३ व ५ मधून राजेंद्र सिंग भुल्लर कुटुंबातून- ३, विजय पाटील कुटुंबाकडून प्रभाग क्रं-१९ व २० मधून -३ उमेदवारी देण्यात आली. शेरी लुंड व अमर लुंड भाऊ ऐवून कंचन लुंड अमर लुंड यांची पत्नी आहे. धनंजय बोडारे व वसुधा बोडरे पती पत्नी असून शीतल बोडारे व वसुधा बोडारे जावा-जावा आहेत. विजय पाटील व युवराज पाटील बापलेक असून मीनाक्षी पाटील त्यांच्या भावाची पत्नी आहे. राजेंद्र सिंग भुल्लर व चरणजीत भुल्लर पती-पत्नी असून विक्की भुल्लर त्यांचा मुलगा आहे. याप्रकाराने भाजप व शिंदेसेनं आमनेसामने ठाकल्याचे बोलले जात आहे.
शिंदेसेनेचे प्रभाग क्रं-१० मधून पती पत्नी असलेले राजेंद्र चौधरी, राजेश्री चौधरी, प्रभाग क्रं-२० मधून पती पत्नी असलेले प्रधान पाटील व ललिता पाटील, प्रभाग-५ व ६ मधून बापलेक असलेले सोनू छाप्रू व निकिता छाप्रू, प्रभाग क्रं-१४ मधून मायलेक असलेले लीला अशान व अरुण अशांन, प्रभाग क्रं-४ मधून शिंदेसेना व रिपाई आघाडीचे नाना बागुल यांचो नोंदणी झाली. भाजपाकडून प्रभाग क्रं-६ व ५ मधून राजेश वधारिया व आईशा हे सासरे-सून, प्रभाग क्रं-१८ मधून पीआरपीचे प्रमोद टाले व अक्षता टाले हे बापलेक, प्रभाग क्रं-१६ व १७ मधून सख्खे भाऊ असलेले भारत राजवानी व विजय राजवानी आदी जोड्या निवडणूक रिंगणात आहेत. या जोड्यानी निवडणूक रणधुमाळीत रंगत आणली असलेतरी त्यांचे कार्यकर्ते या घराणेशाहीवर नाराज असून त्यांना याचा फटका बसणार आहे.