"आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका"; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:34 IST2026-01-06T18:33:40+5:302026-01-06T18:34:35+5:30

Congress on Unopposed Winners, Nagpur Municipal Election 2026: "भाजपच्या मदतीला पोलीस, मंत्री, त्यांचे पीए तर आहेतच; पण आता निवडणूक आयोगही मदत करतोय," असा आरोपही काँग्रेसने केला.

We will not improve is the stance of the Election Commission Congress criticizes the issue of unopposed win in municipal election 2026 | "आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका"; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका

"आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका"; 'बिनविरोध'च्या मुद्द्यावर काँग्रेसची टीका

Congress on Unopposed Winners, Nagpur Municipal Election 2026: राज्यात होत असलेल्या २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये जवळपास ६८ उमेदवार बिनविरोध आल्याच्या मुद्द्यावरून राजकीय रणकंदन सुरू आहे. ज्या प्रभागांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, अशा ठिकाणच्या निवडणुका रद्द करून त्या प्रभागांमध्ये नव्याने निवडणूक प्रक्रिया राबवावी, अशी मागणी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे.

बिनविरोधसाठी सत्ताधारी पक्षाचा तमाशा...

"आधी नगरपालिका व आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा व मित्रपक्षांनी साम, दाम, दंड, भेद नितीचा वापर केला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांचे भाऊ, बहीण आणि वहिनी यांना बिनविरोध करण्यासाठी अत्यंत असभ्य वर्तन केले, गुंडगिरी केली, विरोधकांना दमदाटी केली. त्याचे सीसीटीव्हीचे फुटेज प्रशासनाने गायब केले. सर्वबाजूने तक्रार झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिले, पण त्यातून नार्वेकर यांच्यावर कसलीच कारवाई केलेली नाही. भाजपच्या मदतीला पोलीस, मंत्री, त्यांचे पीए तर आहेतच; पण आता निवडणूक आयोगही त्यांना मदत करत आहे," असा आरोप सपकाळ यांनी दिले.

'आम्ही सुधारणार नाही’ हीच निवडणूक आयोगाची भूमिका

"बिनविरोध निवडणुकीच्या बाबतीत काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली असून जेथे निवडणुका बिनविरोध झाल्या, तेथे नोटाचा पर्याय ठेवा अशी आमची मागणी आहे. न्यायालयात जाण्याबाबत कायदेतज्ज्ञांशी विचारविमर्श करू. पण निवडणूक आयोग मात्र सहकार्य करताना दिसत नाही. 'आम्ही सुधारणार नाही' हीच निवडणूक आयोगाची भूमिका दिसते," असा टोला सपकाळ यांनी लगावला.

Web Title : कांग्रेस ने निर्विरोध विजेताओं पर चुनाव आयोग की आलोचना की।

Web Summary : नगरपालिका चुनावों में निर्विरोध विजेताओं पर कांग्रेस ने चुनाव आयोग और भाजपा की आलोचना की। उन्होंने सत्ता के दुरुपयोग का आरोप लगाया और उन क्षेत्रों में पुन: चुनाव की मांग की जहाँ उम्मीदवार निर्विरोध जीते, 'नोटा' विकल्प का सुझाव दिया।

Web Title : Congress slams Election Commission over unopposed winners in municipal polls.

Web Summary : Congress criticizes the Election Commission and BJP over unopposed winners in municipal elections. They allege misuse of power and demand re-elections where candidates won unopposed, suggesting a 'NOTA' option.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.