मतदारांचा ईव्हीएमवर संताप; बिघाडसत्रामुळे मतदान न करताच परतले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 09:09 AM2019-04-23T09:09:43+5:302019-04-23T09:12:14+5:30

जालन्यातील टाकळी अंबड येथे गेल्या दीड तासापासून मतदान यंत्र बंद आहे.

Voters' anger over EVMs; Due to the failures of EVM, they returned without voting | मतदारांचा ईव्हीएमवर संताप; बिघाडसत्रामुळे मतदान न करताच परतले

मतदारांचा ईव्हीएमवर संताप; बिघाडसत्रामुळे मतदान न करताच परतले

googlenewsNext

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेच्या 14 मतदारसंघांमध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. उन्हाचा ताप टाळण्यासाठी सकाळी-सकाळी मतदान केंद्रावर गेलेल्या मतदारांना अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने ताटकळत रांगेत उभे रहावे लागले. यामुळे अनेकजण मतदान न करताच माघारी परतल्याचे चित्र दिसत आहे. 


 जालन्यातील टाकळी अंबड येथे गेल्या दीड तासापासून मतदान यंत्र बंद आहे. औरंगाबाद येथील बुथ क्रमांक 211, 210 आणि 161 वर ईव्हीएममध्ये बिघाड झाला होता. यामुळे मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर अमळनेर येथे जी एस हायस्कूल मतदान केंद्रावर 20 मिनिटे उशिराने मतदान सुरू झाले. 

माढ्यामध्ये सर्वाधिक बिघाडाच्या तक्रारी
माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथील मतदान केंद्र क्रमांक 158,160 वरील मशीन बंद होते. याच मतदारसंघातील सांगोला येथील भोपळे रोडवरील मराठी शाळा नंबर 1 येथील मतदान केंद्र 140 मधील मशीन एक तास झाले बंद पडले होते. यामुळे मतदार खोळंबून निघून गेले. तसेच न्यू इंग्लिश स्कूल मतदान केंद्र 155 मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली होती. तर भीमनगर येथे मतदान केल्यानंतर मशीनचे बटन दाबले जात नव्हते त्यामुळे मतदान प्रक्रिया थांबली होती.


औरंगाबादमधील मतदान केंद्र क्रं.222, 219 वरील मशीन तासभर सुरू न झाल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. डोकेवाडी ( ता.श्रीगोंदा ) मतदान केंद्रावर अर्धा तास उशीरा मतदान सुरू. ईव्हीएम बंद पडले होते. तर कोल्हापूरमध्ये सात ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरूच झालेल्या नसल्याने मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. सातारातील जवळवाडी ( मेढा) येथे मतदान मशिन नादुरूस्तीमुळे ४५ मिनिटे उशिराने मतदानाला सुरूवात झाली. चोपडा तालुक्यात दोन केंद्रांवर मतदान यंत्रात तांत्रिक बिघाडामुळे उशिराने मतदान सुरू झाले. 


अलिबाग विधानसभा मतदार संघात थळ चाळमळा साई मंदिर मतदान केंद्र मशीन बिघडल्यामुळे सकाळी 9 वाजता मतदान सुरु झाले आहे. तर सांगलीत गुजराती हायस्कुलमध्ये मशिन बंद पडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला.  तासभर वाट पाहून पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेकजण मतदान न करता माघारी परतले. 

Web Title: Voters' anger over EVMs; Due to the failures of EVM, they returned without voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.