‘ते’ साडेतीन काेटी मतदार निवडणार सरकार, देशात सुजाण समजले जाणारे मतदार अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 05:45 AM2024-03-25T05:45:51+5:302024-03-25T12:57:52+5:30

महाराष्ट्रात ५ टप्प्यात लाेकसभेचे मतदान हाेणार आहे. 

The government will select three and a half crore voters, more voters who are considered intelligent in the country | ‘ते’ साडेतीन काेटी मतदार निवडणार सरकार, देशात सुजाण समजले जाणारे मतदार अधिक

‘ते’ साडेतीन काेटी मतदार निवडणार सरकार, देशात सुजाण समजले जाणारे मतदार अधिक

मुंबई : महाराष्ट्रात उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक ४८ लाेकसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे केंद्रात सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रातील मतदारांची भूमिका फार महत्त्वाची आहे. राज्यातील ४० टक्के मतदार हे ३० ते ४९ या वयाेगटातील आहेत. या गटाचे मतदान निर्णायक ठरु शकते. या वयाेगटातील लाेक आपले नवीन सरकार निवडण्यात माेलाचा वाटा उचलू शकता.

महाराष्ट्रात ५ टप्प्यात लाेकसभेचे मतदान हाेणार आहे. उमेदवाराच्या निवडीसाठी हे तरुण मतदान निर्णायक ठरणार आहेत. कारण, ४० टक्के मतदार मतदारसंघातील विजयाचे गणित बदलू शकतात. या निमित्ताने हे तरुण आपला लोकप्रतिनिधी निवडण्यात महत्वाची भूमिका बजावणार आहेत.

वयाेगट    मतदार    प्रमाण
३०-३९ वर्षे    २.०७ काेटी    २२.५९%
४०-४९ वर्षे    २.०२ काेटी    २१.५८%
५०-५९ वर्षे    १.५३ काेटी    १६.३४%
६०-६९ वर्षे    ०.९८ काेटी    १०.६६%
७०-७९ वर्षे    ०.५३ काेटी    ५.८%
८०-८९ वर्षे    ०.२० काेटी    २.२८%
८० पेक्षा जास्त    ५.३१ लाख    ०.५८%
८५ पेक्षा जास्त    १३.१३ लाख    -    
१०० पेक्षा जास्त    ५२ हजार    -

१,८४,८४१ नव्या मतदारांची नाेंदणी १७ ते २२ मार्च या कालावधीत झाली आहे

७० पेक्षा जास्त वयाच्या महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.

Web Title: The government will select three and a half crore voters, more voters who are considered intelligent in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.