Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 21:35 IST2025-07-23T21:34:15+5:302025-07-23T21:35:28+5:30

पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात एका निवासी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला

Shocking: 3-Year-Old Girl Dies After Falling From 12th Floor In Nallasopara East | Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!

Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!

पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात निवासी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत मुलगी वसई येथील रहिवासी असून नालासोपारा येथे आपल्या पालकांसह नातेवाईकांना भेटण्यासाठी आली होती. परंतु, घरी परत असताना बूट घालण्यासाठी आईने मुलीला फुटवेअर स्टोरेज बॉक्सवर उभे केले. त्याचवेळी मुलीचा तोल गेला आणि ती इमारतीच्या खाली पडली. ही २२ जुलै २०२५ रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, मयत मुलगी मंगळवारी आपल्या पालकांसह नालासोपारा येथील नातेवाईकांच्या घरी गेली होती. नातेवाईकांच्या घरी पाहुणचार घेतल्यानंतर कुटुंब घरी परतण्याच्या तयारीत असताना आईने मुलीला बूट घालण्यासाठी फुटवेअर स्टोरेज बॉक्सवर उभे केले. परंतु, अचानक तिचा तोल गेला आणि ती १२ व्या मजल्याच्या कॉरिडॉरवरून खाली पडली. या दुर्घटनेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पालकांनी तिला ताबडतोब वसईतील डी.एम. पेटिट रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

Web Title: Shocking: 3-Year-Old Girl Dies After Falling From 12th Floor In Nallasopara East

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.