...म्हणून यांना देवेंद्र फडणवीसांचं वाईट वाटतं; सदाभाऊ खोतांचं पवारांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:31 IST2024-12-10T13:29:41+5:302024-12-10T13:31:54+5:30

Sadabhau Khot Sharad Pawar: मारकडवाडी येथे भाजपची सभा झाली. या सभेत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर हल्ला चढवला. 

"Sharad Pawar's Party of Nationalist Thugs and Looters"; Criticism of Sadabhau Khota | ...म्हणून यांना देवेंद्र फडणवीसांचं वाईट वाटतं; सदाभाऊ खोतांचं पवारांवर टीकास्त्र

...म्हणून यांना देवेंद्र फडणवीसांचं वाईट वाटतं; सदाभाऊ खोतांचं पवारांवर टीकास्त्र

Sharad Pawar Sadabhau Khot: ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर मागणी घेण्याची मागणी झालेल्या मारकडवाडी गावात भाजपची सभा झाली. आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थित ही सभा झाली. या सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

मारकडवाडीत सदाभाऊ खोत म्हणाले, "पवार साहेब, मायमाऊली आपल्या बूथचं संरक्षण करत असेल, तर तुमचा राष्ट्रवादी पक्ष हा पक्ष नाही, तर गुंडांची टोळी आहे. ती गुंडांची आणि लुटारूंची टोळी या महाराष्ट्रात गाडण्याचं काम कुणी केलं असेल, तर त्याचं नाव देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) आहे."

फडणवीसांची नजर पडली तर तुरुंगात जाण्याची भीती

"देवेंद्र फडणवीसांचं यांना वाईट का वाटतंय, तुमच्या लक्षात आलंय का? ते शाळा काढत नाहीत. ते कारखाना काढत नाहीत. ते दूध संघ काढत नाहीत. ते कारखाना काढत नाहीत. ते मेडिकल कॉलेज काढत नाहीत. ते पतसंस्था काढत नाहीत. ते काही हाणेना (पैसे खाणे) झालेत. यांना वाटतं की, आम्ही आता हाणलं. या गड्याची (देवेंद्र फडणवीस) नजर गेली, तर आम्हाला (पवार) कुठं बसावं लागेल. सळईतून भाकरी आणि नळीतून भाजी (तुरुंगात)", असा टोला सदाभाऊ खोतांनी लगावला. 

"देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात शरद पवार का आहेत. ते सरकारला दुभती गाय म्हणतात. त्याचं म्हणणे आहे की, या गाईला खुश ठेवायचं म्हणजे तिला चारा घालायचा म्हणजे आपल्याला. मग अनुदान द्यायचं, सोसायटीत चेअरमन करायचं. कुठे सरपंच करायचं. कारखान्यावर संचालक करायचं. सुतगिरणी, दूध संघावर संचालक करतात. मग पवार साहेब म्हणतात, त्या गाईला फक्त हुंगायला द्यायचं आणि दूध सगळं काढून घ्यायचं. पण, देवेंद्र फडणवीसांनी सगळं दूध मालकाला (जनतेला) दिले. मग शुक्लकाष्ठ याचं आंदोलन, त्याचं आंदोलन, त्या जातीला वर करायचं, या जातीला वर करायचं", अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

Web Title: "Sharad Pawar's Party of Nationalist Thugs and Looters"; Criticism of Sadabhau Khota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.