Sanjay Shinde's defeat in the farm; Young man tried suicide | माढ्यात संजय शिंदेंचा पराभव; तरूणाने केला आत्महत्येचा प्रयत्न
माढ्यात संजय शिंदेंचा पराभव; तरूणाने केला आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्दे- माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संजय शिंदे याचा पराभव- भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला विजयोत्सव साजरा

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे याचा भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पराभव केला. हा झालेला पराभव सहन न झाल्याने माढा तालुक्यातील शिंदेवाडीचा तरूण पांडूरंग शिंदे (वय २५ रा. शिंदेवाडी, ता. माढा) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

या घटनेनंतर पोलीसांनी खासगी रूग्णालयात धाव घेऊन तरूणाच्या प्रकृतीची माहिती घेत जबाब नोंदवून घेतला. या घटनेची नोंद बार्शी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात यंदा लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून संजय शिंदे यांनी निवडणुक लढविली. निवडणुक प्रचारात संजय शिंदे यांनी जोरदार गावभेट दौरे करून प्रचारात रंगत आणली होती. भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती, मात्र मतदारांनी दिलेल्या कौलमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदेना पराभवाला सामोरे जावे लागले.


Web Title: Sanjay Shinde's defeat in the farm; Young man tried suicide
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.