Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 10:07 AM2024-06-04T10:07:11+5:302024-06-04T10:12:07+5:30

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाचे नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात कांटे की टक्कर दिसत आहे.

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result live update: First Vinayak Raut, now Narayan Rane in the lead | Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: विनायक राऊतांनी नारायण राणेंचे लीड तोडले; 30 मतांनी आघाडीवर

Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result: महाराष्ट्रातील सर्वात महत्वाच्या मतदारसंघातील एक असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गात भाजपाचे नारायण राणे (Narayan Rane) आणि ठाकरे शिवसेनेचे विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यात कांटे की टक्कर दिसत आहे. मतमोजणीच्या दोन फेऱ्यांचे निकाल हाती आले आहेत. 

यानुसार नारायण राणे 2305 मतांनी आघाडीवर होते. विनायक राऊत पहिल्या फेरीत ४०० मतांनी आघाडीवर होते. नारायण राणेंना सिंधुदुर्गातून मतांची आघाडी मिळत असून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी जिल्ह्यात विनायक राऊतांना आघाडी मिळत आहे. सध्या तिसऱ्या फेरीअखेर राऊत यांनी ३० मतांची लीड घेतली आहे.

यामुळे रत्नागिरीचा पट्टा राऊतांना तर सिंधुदुर्गातील तीन विधानसभा मतदारसंघांत राणेंना आघाडीची मते मिळताना दिसत आहेत. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी तिकीट न मिळाल्याने व्यक्त केलेली उघड नाराजी राऊतांच्या फायद्याची ठरताना दिसत आहे.  

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे नारायण राणे आणि उद्धवसेनेकडून खासदार विनायक राऊत यांच्यात थेट लढत झाली आहे. एकूण ९ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी ही लढत दुरंगी असणार आहे. महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या जागेवर आपलाच उमेदवार विजयी होईल, असा दावा करण्यात येत आहे.

सावंतवाडी पहिली फेरी
१९६५ राणे आघाडीवर 
११४० राणे आघाडीवर 

कणकवली पाहिले 
१२०० राणे आघाडीवर 
११०० राणे आघाडीवर 


कुडाळ 
१४४५ राणे आघाडीवर 
६७२ राणे आघाडीवर 


राजापूर
२१४७ राऊत आघाडीवर 
१५८५ राऊत आघाडीवर 

चिपळूण 
१७३८ राऊत आघाडीवर 
८७ राऊत आघाडीवर  

रत्नागिरी
७१४ राऊत आघाडीवर 
५१ राऊत आघाडीवर 
 

Web Title: Ratnagiri-Sindhudurga Lok sabha Election Result live update: First Vinayak Raut, now Narayan Rane in the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.