विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे पहिले नाहीत, ठरतील दुसरे; मग पहिले कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:31 IST2024-12-09T09:30:43+5:302024-12-09T09:31:15+5:30
संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल.

विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष होणारे राहुल नार्वेकर हे पहिले नाहीत, ठरतील दुसरे; मग पहिले कोण?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे ॲड. राहुल नार्वेकर हे संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे अध्यक्ष असतील. यापूर्वी ज्येष्ठ नेते बाळासाहेब भारदे हे १९६२ आणि १९६७ असे दोन वेळा अध्यक्ष झाले होते.
सयाजी सिलम हेही दोनवेळा अध्यक्ष होते, पण त्यांचा एक कार्यकाळ हा संयुक्त महाराष्ट्र होण्याआधीचा होता. संयुक्त महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे ११ वेळा, राष्ट्रवादीकडे तीन वेळा, भाजपकडे दोन वेळा, तर शिवसेनेकडे एकवेळा राहिले आहे. आता भाजपला तिसऱ्यांदा हे पद मिळेल.
आजवरचे विधानसभा अध्यक्ष (संयुक्त महाराष्ट्र)
अध्यक्षांचे नाव कार्यकाळ राजकीय पक्ष
सयाजी सिलम १ मे १९६० ते १२ मार्च १९६२ काँग्रेस
बाळासाहेब भारदे १७ मार्च १९६२ ते १३ मार्च १९६७ काँग्रेस
बाळासाहेब भारदे १५ मार्च १९६७ ते १५ मार्च १९७२ काँग्रेस
बॅ. शेषराव वानखेडे २२ मार्च १९७२ ते २० एप्रिल १९७७ काँग्रेस
बाळासाहेब देसाई ४ जुलै १९७७ ते १३ मार्च १९७८ काँग्रेस
शिवराज पाटील १७ मार्च १९७८ ते ६ डिसेंबर १९७९ काँग्रेस
प्राणलाल व्होरा १ फेब्रुवारी १९८० ते २९ जून १९८० काँग्रेस
शरद शंकर दिघे २ जुलै १९८० ते ११ जानेवारी १९८५ काँग्रेस
शंकरराव जगताप २० मार्च १९८५ ते १९ मार्च १९९० काँग्रेस
मधुकरराव चौधरी २१ मार्च १९९० ते २२ मार्च १९९५ काँग्रेस
दत्ताजी नलावडे २४ मार्च १९९५ ते १९ ऑक्टोबर १९९९ शिवसेना
अरुण गुजराथी २२ ऑक्टोबर १९९९ ते १७ ऑक्टो. २००४ राष्ट्रवादी
बाबासाहेब कुपेकर ६ नोव्हेंबर २००४ ते ३ नोव्हेंबर २००९ राष्ट्रवादी
दिलीप वळसे पाटील ११ नोव्हेंबर २००९ ते ८ नोव्हेंबर २०१४ राष्ट्रवादी
हरीभाऊ बागडे १२ नोव्हेंबर २०१४ ते २५ नोव्हेंबर २०१९ भाजप
नाना पटोले १ डिसेंबर २०१९ ते ४ फेब्रुवारी २०२१ काँग्रेस
राहुल नार्वेकर ३ जुलै २०२२ ते २६ नोव्हेंबर २०२२ भाजप
कोण आहेत नार्वेकर?
कुलाबा; मुंबई या विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यावेळी दुसऱ्यांदा निवडून आले आहे. ३ जुलै २०२२ रोजी ते विधानसभा अध्यक्ष झाले.
विधानभवनची इमारत ही त्यांच्या विधानसभा मतदारसंघातच येते. ते बी.कॉम. एलएल.बी. आहेत. पूर्वी एकदा विधानपरिषदेचेही ते सदस्य होते. विविध शैक्षणिक व सामाजिक संघटनांचे विधि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले