...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:30 IST2026-01-15T12:29:27+5:302026-01-15T12:30:26+5:30
Devendra Fadanavis on Thackerays Bhagwa Brigade: नागपूर भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केली टीका. "भगवा ब्रिगेड मालवणीत का दिसत नाही?" असा सवाल विचारला.

...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा
नागपूर : ठाकरे बंधूंवर बोचरी टीका यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. "यांची 'भगवा ब्रिगेड' फक्त सिलेक्टिव्ह आहे का? ही ब्रिगेड मालवणी किंवा संवेदनशील बूथवर का दिसत नाही? तिथे का जात नाहीत?" असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दहशत वगैरे निर्माण करण्याची यांची क्षमता राहिलेली नाही. केलीच तर पोलीस ठोकून काढतील. मुंबईच नाही तर राज्यात कोणी दहशत निर्माण केली तर खपवून घेतली जाणार नाही. लोकांना अडविण्याचा प्रयत्न केला, दुबार मतदार शोधण्याचे काम इलेक्शन कमिशन, तुमचा आतमध्ये बसलेला एजंट करेल, हे कोण मारमाऱ्या करणारे. मतदान कमी होण्यासाठी यांचा प्रयत्न असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र महापालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रभाग ११ मधील भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर गोरेवाडा परिसरात मध्यरात्री काही अज्ञात गुंडांनी जीवघेणा हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी जाऊन शिंगणे यांची विचारपूस केली आणि हल्लेखोरांना कठोर इशारा दिला.
मुख्यमंत्री भूषण शिंगणे यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस माध्यमांशी बोलताना कमालीचे आक्रमक दिसले. "ज्यांनी भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला केला आहे, त्यातील कोणालाही सोडले जाणार नाही. अशा प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस त्यांना ठोकून काढतील," अशा शब्दांत त्यांनी गुंडगिरी करणाऱ्यांना इशारा दिला.