‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:04 IST2026-01-13T17:03:41+5:302026-01-13T17:04:57+5:30
Municipal Election : राज्यात मतदान होत असलेल्या २९ पैकी २८ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा
नगर परिषद निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाने २९ महानगपालिकांच्या निवडणुकीत अधिकाधिक ठिकाणी विजय मिळवण्यासाठी जोर लावला आहे. काही ठिकाणी स्वबळावर तर काही ठिकाणी युतीच्या माध्यमातून भाजपा या निवडणुकीला सामोरा जात आहे. दरम्यान, राज्यात मतदान होत असलेल्या २९ पैकी २८ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा महापौर बसेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सांगली येथे प्रचारसभेला आले असताना चंद्रकांत म्हणाले की, राज्यात मतदान होत असलेल्या २९ महानगरपालिकांपैका २८ महानगरपालिकांमध्ये महायुतीचा विजय होईल. तिथे महायुतीचा महापौर बसेल. त्यात कुठे भाजपाचा महापौर असेल, कुठे शिंदेसेनेचा असेल, तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा असेल. अर्थातच त्यात भाजपाचे सर्वाधिक महापौर असतील. मी यातून एक महानगरपालिका वगळली आहे. ती महानगरपालिका म्हणजे मालेगाव, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी असलेल्या सांगली महानगरपालिकेमध्येही भाजपाचा विजय होईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. सांगलीकरांचा मूड हा प्रो बीजेपी आणि बीजेपीची सत्ता आणण्याचा आहे. त्यामुळेच भाजपाविरोधात सर्व पक्षांना एकत्र यावं लागलं आहे. यामधूनच सांगलीमधील सर्वसामान्य माणूस हा भाजपाच्या बाजूने आहे हे स्पष्ट होतं, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.