प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:15 IST2026-01-14T11:14:31+5:302026-01-14T11:15:12+5:30
Maharashtra Municipal Corporation Election 2026 Data: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून २९ महापालिकांच्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. मागील निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, राज्यात भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली होती.

प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी...
नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि नगर पंचायतच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली होती. उद्या राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये एकाचवेळी निवडणूक होत आहे. ती देखील तब्बल ९ वर्षांनी. या ९ वर्षांत पुलाखालून बरेच राजकारण वाहून गेले आहे. तेव्हा सरळसरळ भाजप शिवसेना युती आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी किंवा चारही पक्ष वेगवेगळे लढत अशीच निवडणूक बहुतांश ठिकाणी होती. परंतू शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत. अशी सर्व भेसळ पाहता कोण कोणासोबत आणि कोण कोणाविरोधात हे समजणेच कठीण झाले आहे. ते समजण्यासाठी तुम्हालाया लिंकवर क्लिककरावे लागेल... अशातच या महापालिकांवर कोण सत्ता मिळविणार याच्या चर्चा रंगल्या आहेत.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून २९ महापालिकांच्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. मागील निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, राज्यात भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली होती. आता प्रशासक राज येण्यापूर्वी कोणाची सर्वाधिक महापालिकांवर सत्ता होती, याची आकडेवारी समोर आली आहे.
प्रशासकराजपूर्वी भाजपची १३ महापालिकांमध्ये थेट सत्ता होती किंवा यूती करून ते सत्तेत होते. याची टक्केवारी काढली तर २९ महापालिकांपैकी जवळपास ४५ टक्के महापालिकांवर भाजपची सत्ता होती, असे दिसून येते. तर काँग्रेसची ०५ महापालिकांमध्ये सत्ता होती. काही ठिकाणी काँग्रेसने आघाडी देखील केलेली होती. मराठवाड्यात हे प्रमाण अधिक होते. काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांनीही सत्ता मिळवली होती.
मतदानाचा ट्रेंड
शहरांच्या आकारानुसार बदलते चित्र लहान व मध्यम महापालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या उलट मुंबई महानगर प्रदेशातील महापालिकांमध्ये मतदानाचे प्रमाण कमी आहे. दाट लोकसंख्या, स्थलांतरितांची मोठी संख्या आणि व्यस्त जीवनशैली यामुळे मतदानाबाबत उदासीनता वाढलेली दिसते.
भाजपची सत्ता असलेल्या प्रमुख महापालिका
| अनुक्रम | महानगरपालिका |
| १ | पुणे |
| २ | नागपूर |
| ३ | नाशिक |
| ४ | पिंपरी-चिंचवड |
| ५ | सोलापूर |
| ६ | अमरावती |
| ७ | अकोला |
| ८ | पनवेल |
| ९ | मिरा-भाईदर |
| १० | चंद्रपूर |
| ११ | लातूर |
| १२ | सांगली-मिरज-कुपवाड |
| १३ | धुळे |