पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क 

By अंकुश गुंडावार | Published: April 19, 2024 08:58 AM2024-04-19T08:58:41+5:302024-04-19T08:59:47+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: स्नेहल अरुण शुक्ला प्रभाग क्रमांक 8 हिचा विवाह कौस्तुभ अवस्थी यांच्याशी गुरुवारी (18) अर्जुनी मोर येथे संपन्न झाला. शुक्रवारी बिदाई (पाठवणी ) होती. तत्पूर्वी त्यांनी मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजाविला.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Voting rights exercised by newly married couple before sending | पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क 

पाठवणीपूर्वी नवविवाहित जोडप्याने बजावला मतदानाचा हक्क 

गोंदिया - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान आज झाले. आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांनी सकाळी सात वाजतापासूनच मतदान केंद्रावर गर्दी केली होती. स्नेहल अरुण शुक्ला प्रभाग क्रमांक 8 हिचा विवाह कौस्तुभ अवस्थी यांच्याशी गुरुवारी (18) अर्जुनी मोर येथे संपन्न झाला. शुक्रवारी बिदाई (पाठवणी ) होती. तत्पूर्वी त्यांनी मतदान केंद्रावर पोहचत मतदानाचा हक्क बजाविला.

वाढते तापमान लक्षात घेता सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी
गेल्या दोन दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पारा चाळीशीवर पोहचला आहे. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पासून मतदारानी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. मतदान केंद्रावर दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. शहरी भागासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुद्धा मतदारांमध्ये मतदानाप्रति उत्साह दिसून आला. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना मतदान करण्यासाठी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Voting rights exercised by newly married couple before sending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.