Maharashtra Election 2019 : शरद पवारांची मानसिकता ढासळल्याने ते हातवारे करताहेत, मुख्यमंत्र्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:55 PM2019-10-13T12:55:17+5:302019-10-13T13:02:51+5:30

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे.

Maharashtra Election 2019: Chief Minister Devendra Fadanvis attack on Sharad Pawar | Maharashtra Election 2019 : शरद पवारांची मानसिकता ढासळल्याने ते हातवारे करताहेत, मुख्यमंत्र्यांची टीका

Maharashtra Election 2019 : शरद पवारांची मानसिकता ढासळल्याने ते हातवारे करताहेत, मुख्यमंत्र्यांची टीका

googlenewsNext

जळगाव - विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. दरम्यान, लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दात हातवारे करून टीका करणाऱ्या शरद पवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमधील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'आम्ही नटरंग नाही, त्यामुळे तसे हातवारे करीत नाही. ते आम्हाला शोभत नाही. पवारांची मानसिकता ढासळली असल्याने असे हातवारे करीत आहेत,'असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पहिली सभा आज जळगावात झाली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री गुलाबराव पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेदरम्यान मतदारांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ''खरा पैलवान कोण? हे जनता 24 ऑक्टोबरला दाखवून देईल. तसेच आम्ही काही नटरंग नाही. त्यामुळे आम्ही हातवारे करत नाही. तसेच ते आम्हाला शोभतही नाही. सध्याच्या परिस्थितीमुळे शरद पवार यांची मानसिकता ढासळी आहे. त्यामुळे ते हातवारे करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. 

दरम्यान, निवडणुकीमध्ये बंडखोरांकडे लक्ष देऊ नका, त्यांना कुणाचाही आशीर्वाद लाभलेला नाही. त्यामुळे पक्षचिन्ह असलेले उमेदवार निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर कोणीच विरोधक नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विधानाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. लढाई पैलवानांमध्ये होते, इतरांमध्ये नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी फडणवीसांवर प्रतिहल्ला चढवला. सोलापूरमधील बार्शीत पवारांनी  शनिवारी प्रचारसभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली. 

शरद पवारांचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या दिलीप सोपल यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बार्शीत राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासाठी घेतलेल्या प्रचारसभेत बोलताना पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. 'मुख्यमंत्री म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीसाठी कोणी समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते. अशांची (हातवारे करून) होत नाही,' अशी टीका पवारांनी केली. पवारांनी केलेल्या हातवाऱ्यांवर भाजपा नेत्यांनी आक्षेप घेतला होता. 

 

Web Title: Maharashtra Election 2019: Chief Minister Devendra Fadanvis attack on Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.