Maharashtra Budget : प्रवास होणार सुस्साट! मेट्रो प्रकल्पांसाठी मोठ्या घोषणा; रेल्वे प्रकल्प, बसस्थानकंही होणार Upgrade
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 03:08 PM2023-03-09T15:08:20+5:302023-03-09T15:30:04+5:30
Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या अमृतकाळातील पहिले अर्थसंकल्प असून ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे.
2023-24 चा हा अर्थसंकल्प शिंदे-फडणवीस सरकारच्या अमृतकाळातील पहिले अर्थसंकल्प असून ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित आहे. यामध्ये शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, पर्यावरणपूरक विकास, रोजगारनिर्मिती, गुंतवणूक, महिला यांचा समावेश आहे. तसेच मेट्रो प्रकल्पांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे असून 46 कि.मी. मार्ग खुला झाला आहे, यावर्षी आणखी 50 कि.मी. चा मार्ग खुला करण्यात येणार आहे.
नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी देण्यात आला आहे. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये तर नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार आहे. सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल आणि 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यासोबतच पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटींची तरतूद करण्यात करण्यात आली आहे.
मुंबईतील नवीन प्रकल्प
- मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
- मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये
- नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी
- पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर
- अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो
रस्त्यांसाठी निधी...
- पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद
- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
- विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद
- रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी
- हायब्रीड अॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये
- आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये
- रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्यांची कामे
- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.
- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना
- सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"